'हा' तर आंतरराष्‍ट्रीय दर्जाचा म्‍युझिकल फाऊंटन

    21-Jan-2023
Total Views |
- नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते फार्मा सीईओचा सत्‍कार

Pharma Companies appreciate Musical Fountain 
 
नागपूर : 
म्‍युझिकल फाऊंटन (Musical Fountain) ॲण्ड लाईट बघण्‍यासाठी आतापर्यंत सिंगापूर, दुबईसारख्‍या ठिकाणी जावे लागत होते. पण आता नागपुरातच असा आंतरराष्‍ट्रीय दर्जाचा म्‍युझिकल फाऊंटेशन झाला असून त्‍याचे संपूर्ण श्रेय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाते अशा शब्‍दात 72 व्‍या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेससाठी देशविदेशातून नागपुरात आलेल्‍या विविध फार्मा कंपनीच्‍या सीईओ, विविध संस्‍थांच्‍या अध्‍यक्ष, उपाध्‍यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.
 
इंडियन फार्मास्‍युटिकल काँग्रेस असोसिएशन व फार्मास्‍युटिकल्‍स सायन्‍स विभाग, राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्‍या संयुक्‍तवतीने आजपासून तीन दिवसीय आयपीसी-2023 ला प्रारंभ झाला. कांग्रेसच्‍या उद्घाटन नागपुरात आलेल्‍या फार्मा क्षेत्रातील दिग्‍गजांनी शुक्रवारी सायंकाळी फुटाळा तलावावरील म्‍युझिकल फाउंटेन ॲण्ड लाईट शोचा आनंद घेतला.
 
एसीजी ग्रुपचे अध्‍यक्ष डॉ. अजित सिंग, भारत बायोटेकचे अध्‍यक्ष व कोव्‍हॅक्‍सीनचे निर्माते डॉ. कृष्‍णा इला, सिपेक्‍स इनकॉर्पोरेशनेचे सीईओ प्रदीप गद्रे, ऑल इंडिया केमिस्‍ट ॲण्ड ड्रगिस्‍ट असोसिएशनचे अध्‍यक्ष अप्‍पाजी शिंदे , ब्‍ल्‍युक्रॉस लिमिटेडचे सीईओ डॉ. आशीष शिरसाट, प्रसिद्ध गायक जावेद अली यांच्‍यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्‍थ‍ित होते. खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीच्‍यावतीने आयोजित या शोमध्‍ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते जावेद अली व इतर सर्व फार्मा सीईओ, अध्‍यक्ष व उपाध्‍यक्षांचा यावेळी सत्‍कार करण्‍यात आला.
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.