'तू झूठी मैं मक्कार'चा ट्रेलर पाहताच श्रद्धा कपूरने चाहत्यांना विचारला 'हा' प्रश्न

    20-Jan-2023
Total Views |

Shraddha Kapoor
(Image Source : Instagram/shraddhakapoor)
 
मुंबई : 
अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या (Shraddha Kapoor) 'तू झूठी मैं मक्कार' या आगामी चित्रपटाबद्दल सर्वत्र चर्चा रंगत आहे. चाहते हा चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट बघत आहेत. असे असताना श्रद्धा कपूरने चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर 'क्वेश्चन ऑफ द ईयर' पोस्ट करत '२०२३ मध्ये प्रेमात काय अवघड आहे'? असे विचारले.
 
अशातच, 'तू झूठी मैं मक्कार' या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या ट्रेलरने या कल्पनेला जन्म दिल्याचे दिसते. दरम्यान 'तू झूठी मैं मक्कार' हा चित्रपट प्रेम आणि नातेसंबंधांवर फ्रेश आणि कंटेम्पररी टेकसह मॉडर्न डे-रोम-कॉम बनण्यासाठी सज्ज आहे. तसेच, या चित्रपटाद्वारा रणबीर आणि श्रद्धाची जोडी प्रथमच दर्शकांच्या भेटीला येणार असून काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या टायटल अनाऊंसमेंट व्हिडिओमध्ये दोघांच्या सिझलिंग केमिस्ट्रीची झलक पाहायला मिळाली. आता, श्रद्धाच्या या प्रश्नाचे उत्तर देणे थोडे कठीण असले तरी तिच्या या प्रश्नाने प्रेक्षकांमधील ट्रेलरची अपेक्षा काही प्रमाणात नक्कीच वाढवली आहे.
लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित 'तू झूठी मैं मक्कार'या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. तसेच, टी-सिरीजचे गुलशन कुमार आणि भूषण कुमारद्वारा प्रस्तुत हा चित्रप, ८ मार्च २०२३ रोजी होळीच्या दिवशी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.