'सिनेमा मरते दम तक'ची स्क्रिनिंग; हुमा कुरेशी, सिकंदर खेर, राधिका मदानने लावली हजेरी

    20-Jan-2023
Total Views |
Movie Marte Dum Tak 
 
मुंबई :
ॲमेझॉन ओरिजनल रिअ‍ॅलिटी डॉक्यू-सिरीज 'सिनेमा मरते दम तक' (Cinema Marte Dum Tak) प्रेक्षकांना पडद्यामागील 90 च्या दशकातील हिंदी पल्प मुव्हीजच्या आकर्षक आणि अप्रत्याशित जगात घेऊन जाते. एक गोल्डन-एरा ज्याने कल्ट फेनोमेनाचा फॅनबेस वाढवला. अलीकडेच, प्राईम व्हिडिओ, वसन बाला आणि व्हाईस मीडियाने सिनेसृष्टीतील मित्र आणि मीडिया सदस्यांना एकत्र आणून लव्ह फॉर सिनेमा साजरे करण्यासाठी या रिअ‍ॅलिटी डॉक्यू-सिरीजच्या विशेष स्क्रिनिंगचे आयोजन केले.
यादरम्यान, 'सिनेमा मरते दम तक'ची टीम पूर्ण जोशमध्ये दिसली आणि प्रेक्षकांचे कौतुक, टाळ्या आणि प्रेम पाहून भारावून गेली. या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये हेड ऑफ इंडिया ओरिजनल्स, प्राईम व्हिडिओ अपर्णा पुरोहित, वसन बाला, आणि समीरा कंवरसह विनोद तलवार, शिवा रिंदानी आणि हरीश पटेल यांसारखे 90 च्या दशकातील पल्प इंडस्ट्रीतील क्रिएटर्स आणि टॅलेंट उपस्थित होते. तसेच, इंडस्ट्रीमधून सिकंदर खेर, हुमा कुरेशी, आकांशा रंजन कपूर, राधिका मदान, आरती कदव, कनन गिल, सुमुखी सुरेश, साहिल शाह, कनीज सुरका, सुमैरा शेख, आणि रिताशा राठौर हे कलाकारही या कार्यक्रमाचा भाग होते.
व्हाईस स्टुडिओज प्रोडक्शनद्वारा प्रोड्यूस केलेली आणि उत्कृष्ट फिल्ममेकर वसन बालाद्वारा निर्मित सहा भागांची असेलेल्या या रिअ‍ॅलिटी डॉक्यूमेंट्री-सिरीजमध्ये पहिल्यांदा 90 च्या दशकातील पल्प सिनेमा इंडस्ट्रीतील ग्लिझ आणि इंडिपेंडेंट इकोसिस्टमची झलक दाखवण्यात आली आहे. तसेच, दिशा रिंदानी, झुल्फी आणि कुलिश कांत ठाकूर यांनी सह-दिग्दर्शित केलेली 'सिनेमा मरते दम तक' ही सिरीज त्या काळातील चार विलक्षण दिग्दर्शक - जे नीलम, विनोद तलवार, दिलीप गुलाटी आणि किशन शाह यांच्यासोबत प्रेक्षकांना पडद्यामागे घेऊन जाते. जेव्हा ते आपल्या स्वान गाण्यांसाठी पुन्हा येतात, तेव्हा 30 वर्षांपूर्वीचे समान बजेट आणि थीम वापरून चित्रपट बनवतात.
 
तसेच, 'सिनेमा मरते दम तक' या सिरीजमध्ये रझा मुराद, मुकेश ऋषी, हरीश पटेल आणि राखी सावंत या कलाकारांना पाहायला मिळणार असून, ते भारतीय सिनेमाच्या अशा पैलूंवर आपले विचार व्यक्त करतील ज्याबद्दल दर्शकांना फार कमी माहिती आहे. अभिनेता अर्जुन कपूरला देखील शेवटच्या एपिसोडमध्ये होस्ट म्हणून पाहायला मिळेल. अशातच, 'सिनेमा मरते दम तक'ही सिरीज 20 जानेवारी रोजी भारत तसेच जगभरातील 240 देश आणि प्रदेशांमध्ये प्राईम व्हिडिओवर प्रीमियर होण्यासाठी सज्ज आहे.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.