कोरोना काळात विज्ञान व विश्‍वासाच सांगड घातली - प्रो. महेंद्र पटेल

    20-Jan-2023
Total Views |

prof mahendra patel
 
 
नागपूर :
धार्मिक मुद्दा समोर करून कोरोना काळात लसीकरण आणि क्लिनिकल ट्रायल करायला लोक तयार होत नव्‍हते. भारताप्रमाणेच ब्रिटनमध्‍ये ही मोठी समस्‍या होती. त्‍यामुळे विज्ञानाला विश्‍वासाची जोड देत मेडिकल इन्‍स्टिट्यूट, धार्मिक संस्‍थांच्‍या माध्‍यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी लागली, असे मत ऑक्‍सफर्ड विद्यापीठाचे प्रो. महेंद्र पटेल यांनी व्‍यक्‍त केले.
 
इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस असोसिएशन (IPCA) आणि फार्मास्युटिकल सायन्स विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांच्या संयुक्तवतीने शुक्रवारपासून 72 व्‍या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस (IPC) ला प्रारंभ झाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोडवरील जमनालाल बजाज प्रशासकीय भवन इमारतीच्या परिसरातील हॉल क्रमांक तीनमध्‍ये ‘इमर्जिंग इन्‍फेक्‍शीयस डिसिजेस’ व‍िषयावर परिसंवादाचे आयेाजन करण्‍यात आले होते. यात ऑक्‍सफर्ड विद्यापीठाचे प्रोफेसर महेंद्र पटेल, डीओडीओचे माजी संचालक प्रो. राकेश कुमार शर्मा व चंदिगड येथील सीएसआयआर इन्‍स्‍ट‍िट्यूट ऑफ मायक्राबियल टेक्‍नालॉजीचे प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ. हेमराज नंदनवार यांनी सहभाग घेतला. या परिसंवादाचे अध्‍यक्ष डॉ. बी. के जयकर होते तर डॉ. अभय इत्‍तदवार संयोजक होते.
 
प्रो. महेंद्र पटेल यांनी ‘फार्मसी सपोर्टींग द वर्ल्‍डस लार्जेस्‍ट क्लिनिकल ट्रायल्‍स इन प्रायमरी केअर - कोविड 19’ विषयावर आपले विचार मांडले. प्रा. राकेश कुमार शर्मा यांनी ‘2-डिऑक्‍सी-डी-ग्‍लुकोज फॅार द मॅनेजमेंट ऑफ कोविड - 19’ या विषयावर सादरीकरण केले तर डॉ. हेमंत नंदनवार यांनी ‘डिस्‍कव्‍हरी अँड प्रिक्लिनिकल स्‍टडीज ऑफ अँटीबायोटिक्‍स अगेन्‍स्‍ट ग्रॅम निगेटीव बॅक्‍टेरियल इन्‍फेक्‍शन्‍स’ या विषयावर माहिती दिली.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.