रोजगार मेळाव्यात पंतप्रधान मोदींनी 71 हजार तरुणांना दिली नियुक्तीपत्रे

    20-Jan-2023
Total Views |
 
pm modi at rojagar mela
 (image source: screengrab/tw)
 
नवी दिल्ली: 
पंप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी रोजगार मेळाव्या अंतर्गत भर्ती झालेल्या सुमारे ७१ हजार तरुणांना दूरदृश्य प्रणाली (Video Conferencing) द्वारे संबोधित केले. सोबतच त्यांना नियुक्ती देखील देण्यात आली. रोजगार मेळावा हे पंतप्रधानांच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
 
 
पंतप्रधनांनी १० लाख रिक्त स्थानाच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्यांतर्गत नियुक्ती झालेल्या ७१ हजार तरुणांना नियुक्ती पत्र दिले. कार्यक्रमच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या लोकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी तरुणांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, 'सरकार जे बोलते ते करून दाखवते आणि हा रोजगार मेळा याचे उत्तम उदाहरण आहे.'
 
 
रोजगार मेळा हा सुशासनाची ओळख असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितले. पुढे ते म्हणाले की, ७० हजारांहून अधिक लोकांना रोजगार देण्याचे आम्ही फक्त बोललोच नाही, तर करून देखील दाखविले. बदलत्या भारतात केवळ रोजगारच नाही तर स्वयंरोजगाराची पातळीही वाढल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
 
 
 
रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी हा रोजगार मेळावा हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे पंतप्रधान मंत्रालयाद्वारे सांगिलते जात आहे. रोजगार मेळा हा रोजगार निर्मितीमध्ये प्रेरणा म्हणून काम करेल आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करेल. पंतप्रधान कार्लयाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, देशभरातून निवडलेल्या तरुणांची ज्युनिअर इंजिनीअर, लोको पायलट, तंत्रज्ञ, निरीक्षक, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफर, कनिष्ठ लेखापाल, ग्रामीण डाक सेवक, आयकर निरीक्षक, शिक्षक, नर्स, डॉक्टर, या पदांवर भरती केली जाईल. भारत सरकार अंतर्गत सामाजिक सुरक्षा अधिकारी, पीए, एमटीएस अशा विविध पदांवर पोस्टिंग दिली जाणार असे दखल सांगितले. 
 
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.