विद्यार्थ्यांनो JEE च्या परीक्षेला बसणार आहात? वाचा ही महत्वाची बातमी

    20-Jan-2023
Total Views |

jee main session 1 exam
(Image Source : Internet/ Representative image)
 
नवी दिल्ली :
नॅशनल टेस्टिंग अजेंसी (NTA) ने जेईई (JEE) परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जारी केली आहे. २०२३ च्या जेईई मुख्य (JEE Mains) सेशन पहिली परीक्षा २४ जानेवारीपासून सुरु होणार आहे. यासाठी NTA ने परीक्षेसासाठी एग्जाम सिटी स्लिप (Exam City Slip) जारी केले आहे. जे विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत, त्या विद्यार्थ्यांनी अधिकृत NTA च्या संकेतस्थळावर जाऊन आपली एग्जाम सिटी स्लिप डाऊनलोड करू शकतात.
 
NTA ने परीक्षेसाठी जारी केलेल्या स्लिपवरती विद्यार्थी आपले एक्झाम सेंटर सिटीची माहिती बघू शकणार आहेत. NTA काही वेळातच जेईई (JEE) परीक्षेचे प्रवेशपत्रही (Admit Card) जाहीर करणार आहे. जारी केलेल्या प्रवेशपत्रावरती विद्यार्थ्याचे नाव, परीक्षा केंद्र, शिफ्ट आणि परीक्षेच्या वेळेसह इतर माहिती असणार आहे.
 
लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे एक्झाम सिटी स्लिप आणि प्रवेशपत्र या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांनाकडे त्यांच्या वैध प्रवेशपत्राची प्रिंट असणे आवश्यक आहे. परीक्षेसाठी महत्वाचे दिशानिर्देशही प्रवेशपत्रावरती उपलब्ध असेल. परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी विद्यार्थी NTA च्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.
 
असे मिळवा प्रवेशपत्र
स्टेप १ : विद्यार्त्यांनी प्रथम NTA च्या अधिकृत संकेस्थळावर jeemain.nta.nic.in जावे.
स्टेप २ : होमपेजवर दिसत असलेल्या प्रवेशपत्राची लिंक ओपन करा.
स्टेप ३ : आता आपला तपशील टाकून लॉगिन करा.
स्टेप ४ : आता स्क्रीनवर तुमचे प्रवेशपत्र आले की त्याला डाऊनलोड करा.
स्टेप ५ : प्रवेशपत्राची एक प्रिंटआऊट काढून घ्या.
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.