दैनंदिन जीवनातील 'ही' चूक बानू शकते हृदयविकाराचे कारण

    20-Jan-2023
Total Views |
 
heart care
 (image credit: internet/representative)
 
नागपूर:
हिवाळ्याचे दिवस आले की  शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते. थंडीच्या दिवसांत फारश्या लोकांना अंघोळ करायला आवडत नाही. थंडीमध्ये अंघोळ करणे हे कुठल्या आव्हानापेक्षा कमी नसते. सामान्यतः हिवाळ्याच्या दिवसांत लोकांना गरम पाण्याने अंघोळ करायला आवडते. जितकी थंडी जास्त, अंघोळीसाठी पाणी तितकेच जास्त गरम असते. परंतु तुम्हाला माहित आहे का? सामान्य अशी वाटणारी ही सवय तुमच्या शरीरावर काय परिणाम करू शकते? विशेषतः हृदयाच्या आरोग्यावर याचे फार वाईट परिणाम होऊ शकते. 
 
अंघोळ करण्याआधी सहसा कुणीही इतके विचार करत नाही. कदाचित तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की तुमच्या अंघोळीच्या मार्गावरदेखील तुमच्या हृदयाचे आरोग्य अवलंबू शकते. थंडीमध्ये थंड पाण्याने आंघोळ करणे तर अतिशय हानिकारक आहे. त्याचबरोबर जास्त गरम पाण्याने आंघोळ करणे देखील तितकेच हानिकारक आहे. अटक तुम्हाला प्रश्न पडेल की नेमके करायचे काय? आणि आंघोळीच्या पाण्याच्या तापमानाने मात्र हृदयावर कसे परिणाम पडू शकते? चला तर काय आहे यामागचे कारण. 
 
हिवाळ्यात वातावरणातील थंडीमुळे शरीरातील रक्त वाहिन्या आकुंचन पावतात. ज्यामुळे रक्ताचे दाब देखील वाढू शकते. रक्ताचे दाब वाढले की  हृदयावर याचा थेट परिणाम होतो. हेच कारण आहे की, हिवाळ्याच्या दिवसांत अंघोळ करताना पाण्याच्या तापमानाबद्दल देखील विशेष काळजी घ्यावी लागते. आता जास्त गरम पाण्याचे वापर करता येत नाही, आणि थंड पाण्याने तर तसेही कुणी अंघोळ करू शकत नाही. तर आता एकाच मार्ग उर्वरित राहतो, तो म्हणजे कोमट पाण्याने अंघोळ करणे. विशेष म्हणजे आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोमट पाण्याने आंघोळ करण्याचे शरीराला फायदे देखील आहे.
 
कोमट पाणी जास्त गरम नसते किंवा थंडीही नसते. त्यामुळे शरीराला अर्थात त्वचेला चटके लागत नाही आणि शरीराला थरकाप देखील होत नाही. सोबतच शरीराचे तापमान देखील स्वास्थाला अनुकूल राहते. कोमट पाण्याने अंघोळ केल्याने शरीरातील रक्तभिसरण (Blood  Circulation) देखील वाढते. विशेषज्ञांच्या मते, उन्हाळ्यात देखील थंड पाण्याने अंघोळ करणे किंवा जास्त थंडी पाणी पिणे टाळावे. हिवाळ्यात थंड पाणी शरीरावर टाकताच संपूर्ण शरीरात थरकाप सुटतो. या थरकापामुळे शरीरात रक्तभिसण अधिक जलद गतीने व्हायला लागते. परिणामस्वरूपी आपल्या हृदयावर जास्त दाब येतो आणि हृदयावर वाईट परिणाम होतो. 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.