'इतक्या' तीव्रतेच्या भूकंपाने हादरले ताजिकिस्तान

20 Jan 2023 14:34:02
earthquake in tajikistan
 (image source: screengrab/tw)
 
दुशान्बे:
ताजिकिस्तानमधील दुशान्बे येथे शुक्रवारी भूकंपाचे जोरदार झटके जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.५ इतकी मोजली गेली. ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बेपासून १७१ किमी ईशान्येला शुक्रवारी सकाळी भूकंप झाला.
 
दरम्यान, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ताजिकिस्तानमधील हा भूकंप जमिनीपासून जवळपास १० किमी खोलीवर आले होते. भारतीय वेळेनुसार सकाळी ०९:१६ वाजता हे भूकंपाचे झटके जाणवले. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही आहे. 
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0