गोव्यात रोजगार मेळाव्यात 25 जणांना नियुक्ती पत्र प्रदान

    20-Jan-2023
Total Views |

Goa Rojgar Mela
 
 
पणजी :
केंद्रीय पर्यटन आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज गोव्यात आयोजित रोजगार मेळाव्यात (Goa Rojgar Mela) नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली केली. पणजी येथे आयोजित रोजगार मेळाव्याच्या तिसऱ्या टप्प्यात नव्याने भरती झालेल्या २५ जणांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. गोवा शिपयार्ड, कर्मचारी राज्य विमा महामंडळ, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, कोकण रेल्वे, माझगाव डॉक शिपयार्ड अशा विविध विभागांमध्ये नवीन भरती झाली आहे. यावेळी सीमाशुल्क विभागाचे मुख्य आयुक्त एस.एम. टाटा आणि गोवा विभागाचे आयुक्त व्ही. सुंदरराजन यांची उपस्थिती होती.
 
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच नावीन्यपूर्ण आणि नागरिक केंद्रीत तंत्रज्ञानाचा वापर करत रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर दिला आहे. रोजगार मेळा हे देशातील रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देणारा कार्यक्रम आहे.
 
स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, उत्पादनावर आधारीत लाभ आणि कौशल्य विकास या उपक्रमांचे रोजगार निर्मितीमध्ये मोठे योगदान आहे. रोजगार मेळा भविष्यकालीन रोजगार निर्मितीसाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल आणि तरुणांना सक्षम होण्यासाठी आणि प्रत्यक्ष राष्ट्राच्या विकासात सहभागी होण्यासाठी महत्त्वपूर्ण संधी प्रदान करेल, असे नाईक म्हणाले.
 
मिशन मोड भरती मोहिमेमुळे एका वर्षात १० लाख नोकर्‍या देणे अपेक्षित आहे. तसेच रोजगार मेळा यामुळे खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रात रोजगार निर्मितीचे वातावरण निर्माण होईल.
 
सीमाशुल्क विभागाचे मुख्य आयुक्त एस.एम. टाटा यांनी याप्रसंगी विविध सरकारी उपाययोजनांवर प्रकाश टाकला. 'सरकारची सक्रिय भूमिका लाखो युवक आणि युवतींना रोजगाराच्या माध्यमातून सक्षम बनविण्यात मदत करत आहे. रोजगार मेळा ही देशातील रोजगाराच्या संधींना चालना देण्यासाठी एक अभिनव संकल्पना आहे,' असे ते म्हणाले. महसूल विभागातर्फे आज देशभरात ४५ ठिकाणी रोजगार मेळा आयोजित करण्यात आला होता.
 

अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.