'फर्जी' मधील के. के. मेननची रोमांचक भूमिका; व्हिडिओ आला समोर

    19-Jan-2023
Total Views |

k k menon
 
 
मुंबई :
ॲमेझॉन प्राईम व्हिडिओची आगामी क्राईम थ्रिलर सिरीज 'फर्जी'बद्दल (Farzi) चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस उत्सुकता वाढत आहे. असे असतानाच आता प्राईम व्हिडिओने मन्सूर दलालची व्यक्तिरेखा साकारत असलेल्या के. के. मेननचा रोमांचक पात्र (Character) व्हिडिओ रिलीज केला आहे.
 
अशातच या सिरीजमध्ये के. के. मेनन एका नकली किंगपिनची भूमिका साकारत असून त्याला पकडण्यासाठी आणि बनावट नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी मायकल उर्फ ​​विजय सेतुपती त्याच्या शोधात निघतो. तेजतर्रार किंगपिन, मन्सूर हा भारतीय बनावट नेटवर्कमागील चेहरा आहे.
'फर्जी' ही ८ भागांचा क्राईम थ्रिलर सिरीज आहे, ज्यामध्ये राज आणि डीके यांच्या सिग्नेचर ह्युमर पाहायला मिळणार असून एका हुशार अंडरडॉग स्ट्रीट आर्टिस्टच्या नजरेतून एलीट क्लासची बाजू घेणाऱ्या सिस्टमला फेल करण्याचा प्रयत्न दाखवला आहे. अशातच, 'फर्जी'ही सिरीज १० फेब्रुवारीपासून प्राइम व्हिडिओवर भारत आणि २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्रदर्शित होईल.
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.