एकता कपूरची 'बिग बॉस 16'मध्ये एंट्री; 'लव्ह सेक्स और धोखा 2'ची घोषणा करणार?

    19-Jan-2023
Total Views |

Ekta Kapoor
 
 
मुंबई :
प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि टेलिव्हिजन क्वीन एकटा कपूर पून्हा एकदा चर्चेत आली आहे. एकता आर कपूर आणि दिबाकर बॅनर्जी यांनी डिजिटल टेक्नोलॉजीचा प्रभाव दर्शवत 2010 मध्ये 'लव्ह सेक्स और धोखा' हा एक्सपेरिमेंटल चित्रपट दर्शकांच्या भेटीला आणला होता. यानंतर आता एकता कपूर लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग 'लव्ह सेक्स और धोखा 2'ची (Love Sex Aur Dhoka 2) घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे. इतकेच नाही तर 'बिग बॉस 16' च्या घरात चित्रपटाची घोषणा होणार असल्याचे बोलले जात आहे.
 
2010 मध्ये प्रदर्शत झालेल्या 'लव्ह सेक्स और धोखा' मध्ये एमएमएस स्कॅन्डल, ऑनर किलिंग आणि स्टिंग ऑपरेशन्स अशा विषयांवर प्रकाश टाकण्यात आला होता. म्हणजेच, ज्यावेळी इंडस्ट्रीत रन-ऑफ-द-मिल सिनेमा बनवले जात होते, तेव्हा फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात पावरफुल फिमेल प्रोड्यूसरने काहीतरी अनोखे करण्याचे धाडस केले होते.
 
दरम्यान या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल अनेक अंदाज लावले जात आहेत. अशातच, एकता आर कपूर आणि दिबाकर बॅनर्जी बालाजी टेलिफिल्म्सचा पुढील चित्रपट 'लव्ह सेक्स और धोखा 2'ची घोषणा करण्यासाठी बिग बॉस 16 च्या घरात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. शोचे अनोखे नेचर लक्षात घेता, जे नुकतेच देशाचे गिल्टी ऑब्सेशन बनले आहे, असे म्हणू शकतो की निर्माते या संधीकडे एक स्मार्ट मार्केटिंग मूव्ह म्हणून पाहत आहेत.
 
यात आश्चर्य नाही, कारण एकता आर कपूर नेहमीच मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटवर आपली पकड राखण्यासाठी ओळखली जाते. तसेच, त्यांनी आपल्या प्रवासात शार्प इंट्यूशन आणि बिझनेस कौशल्य दाखवले आहे.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.