तिबेटमध्ये हिमस्खलनामुळे ८ जणांचा मृत्यू

    19-Jan-2023
Total Views |
 
8 people died in avalanche in tibet
 (Image Source : Internet/representative)
 
ल्हासा:
तिबेटच्या नैऋत्य भागातील न्यिंगची शहरात प्रचंड हिमस्खलन झाला आहे. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हिमस्खलनानंतर चीन सरकारने मदतीसाठी बचाव पथक पाठवले.
मेनलिंग काउंटीमध्ये पाई गाव आणि मेडोग काउंटीमध्ये डॉक्सॉन्ग ला बोगद्याजवळ ही दुर्घटना झाली. मंगळवारी रात्री ८ वाजता हे हिमस्खलन झाल्याचे सांगितले जात आहे. हिमस्खलनानंतर अनेक लोक आणि काही वाहनेदेखील अडकल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, बेपत्ता लोकांच्या संख्येबद्दल अध्याप कुठेही स्पष्ट वृत्त नाही आहे. मिळालेल्या माहितीनुसार चीन सरकारने २८ वाहने आणि १३१ लोकांचा बचप पथक घटनास्थळी पाठवला आहे. चीनच्या आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाने नैऋत्य तिबेट स्वायत्त प्रदेशातही पथके पाठवली आहेत.
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.