द किंग इज बॅक...

    18-Jan-2023
Total Views |

virat kohli
 (Image Source : Internet)
 
 
रात्री नंतर सकाळ होतेच.... अंधारातून मार्ग काढला की प्रकाश दिसतोच, मात्र हीच सकाळ आणि प्रकाश पाहण्यासाठी आपल्याकडे हवा तो संयम आणि स्वतःच्या क्षमतेवर असलेला विश्वास. जर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असेल आणि कितीही कठीण काळ आला तरी संयम सोडला नाही, तर अपयशाची साखळी तोडून माणूस यशाची शिखरे गाठतोच. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भारताचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहली. गेली तीन वर्ष विराट कोहली हा अपयशाच्या गर्तेत सापडला होता. धावांची रास उभारणारी विराट कोहलीची बाब त्याच्यावर रुसली होती.
 
शतकाचे इमले उभारणाऱ्या विराटला मागील तीन वर्षात एकही शतक झळकावता आले नाही. त्यामुळे त्याच्यावर टीका होऊ लागली. काही महाभागांनी तर त्याला संघाच्या बाहेर ठेवण्याची मागणी केली. स्वतःला क्रिकेटचे तज्ज्ञ म्हणवून घेणारे देखील विराटवर टीका करू लागले. मीडियात देखील विराटवर हल्ला होऊ लागला. विराटचा हरवलेला फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय ठरला होता. विराट मात्र टिकाकरांकडे दुर्लक्ष करून आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करत होता. टिकाकरांच्या टीकेला उत्तर देण्यात त्याने वेळ घालवला नाही. तो नेहमी म्हणत असत की मला फक्त एका मोठ्या खेळीची गरज आहे. ती जर आली की मी पुन्हा फॉर्मात येईल. कारण त्याचा स्वतःचा क्षमतेवर विश्वास होता. त्याला हवी असलेली मोठी खेळी टी २० च्या विश्वचषक स्पर्धेत आला.
 
या स्पर्धेत त्याने एक शतक झळकावले आणि भारताला जुना विराट सापडला. विराट पुन्हा फॉर्मात आला. द किंग इज बॅक....असाच इशारा त्याने या खेळीने जगाला दिला. टी २० विश्वचषकात पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याने अविश्वसनीय खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. तेथून मग त्याने मागे वळून पाहिले नाही. नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आपल्या तडाखेबंद खेळीने त्याने भारताला एकहाती विजय मिळवून देताना अनेक विक्रमांना गवसणी घातली. या मालिकेत त्याने दोन तडाखेबंद शतक झळकावताना एकदिवसीय सामन्यात ४६ तर एकुणात ७४ शतके झळकवण्याचा पराक्रम केला. असा पराक्रम करणारा सचिन नंतरचा तो दुसराच खेळाडू आहे.
 
सध्या खेळत असणारा कोणताही खेळाडू त्याच्या आसपासही नाही. सध्याची कामगिरी पाहता तो लवकरच विक्रमविर सचिन तेंडुलकर यांचा १०० शतकांचा विक्रम लवकरच मोडेल यात शंका नाही. मागील तीन वर्षाचे अपयश मागे टाकून तो पुन्हा आपल्या जुन्या अवतारात परतला आहे हे भारतासाठी शुभचिन्ह आहे. विराट पुन्हा फॉर्मात आल्याने य वर्षी तो धावांचा रतीब घालणार यात शंका नाही. यावर्षी भारत अनेक मोठ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे या मोठ्या स्पर्धेत विराटचा फॉर्म भारताला विजय मिळवून देईन. यावर्षी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक देखील आहे. जर विराटचा हा फॉर्म असाच राहिला आणि त्याला संघातील इतर खेळाडूंनी साथ दिली तर यावेळी भारत २०११ ची पुनरावृत्ती करेल यात शंका नाही. विराट अजूनही तरुण आहे त्याचा फॉर्म परत आला आहे आणि त्याच्या फिटनेसवर तर शंकाच नाही संघातील सर्वाधिक फिट खेळाडू हा विराटच आहे त्यामुळे तो आणखी पाच सहा वर्ष सहज खेळू शकतो. या दरम्यान तो सचिनचा १०० शतकांचा विक्रम सहज मोडू शकतो. सचिनचा विक्रम जर कोणी मोडू शकेल तर तो फक्त विराटच आहे. कारण आज त्याच्या नावे ७४ शतकांची नोंद आहे. सध्या खेळणारा कोणताही खेळाडू त्याच्या आसपासही नाही. त्यामुळे सचिनचा विक्रम विराट कोहलीच मोडेल यात शंका नाही.
 
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.