दावोसमध्ये पहिल्याच दिवशी ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक

    17-Jan-2023
Total Views |
- सुमारे १० हजार प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी

Investment in Maharashtra
(Image Source : tw/@CMOMaharashtra)
 
दावोस :
स्वित्झर्लंड येथील दावोसमध्ये 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक (Investment in Maharashtra) करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.
 
दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले असून त्यांनी दावोस येथे सज्ज असलेल्या 'महाराष्ट्र पॅव्हेलियन'ला भेट दिली. महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार असून महत्त्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जाणार आहेत, असे सामंत म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले असून या माध्यमातून सुमारे १० हजार तरूणांच्या हाताला काम मिळणार असल्याची माहिती सामंत यांनी सांगितली. यावेळी, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित उपस्थित होते.
सामंजस्य काराराबद्दल सविस्तर माहिती
 
'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत करण्यात आलेल्या सामंजस्य काराराबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
१. Greenko energy Projects Pvt. Ltd १२ हजार कोटींची गुंतवणूक
२. Berkshire Hathaway Home Services Orenda India १६ हजार कोटींची गुंतवणूक
३. ICP Investments/ Indus Capital १६ हजार कोटींची गुंतवणूक
४. Rukhi foods २५० कोटींची गुंतवणूक
५. Nipro Pharma Packaging India Pvt. Ltd. १६५० कोटींची गुंतवणूक
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.