नायलॉन मांजाने घेतला चिमुकल्याचा जीव

    16-Jan-2023
Total Views |

Nylon manja took the life of a toddler
Image Source: Internet
 
नागपूर : नवीन वर्षाची सुरुवात मकर संक्राती या सणाने केली जाते. नेहमीसारखे यावर्षी देखील संक्रांतीच्या दिवशी आभाळात सगळीकडे पतंगाचा भरभराट होता. मात्र या उत्सवाने एका चिमुकल्याचा जीव घेतला आहे.
 
ही धक्कादायक घटना जरीपटका भागातली आहे. ज्यामध्ये ११ वर्षीय एका चिमुकल्याचा नायलॉन मांज्यामुळे गळा कापल्याने मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला मुलाचा नाव वेद कृष्णा शाहू आहे. वेद हा जरीपटका भागात महात्मा फुले शाळेतील ५व्या वर्गाचा विद्यार्थी आहे. शनिवार सायंकाळी ४ वाजता कृष्णा आपल्या मुलाला घेण्यासाठी शाळेत गेला होता. शाळेतून निघाल्यावर वेद ने गाडीच्या समोर उभे राहण्याचा हट्ट केला. समोर उभा होऊन ते काही अंतरावर गेले असतांना, त्यांच्या गाडीसमोर नायलॉन मांजा उडत उडत आला. तो मंजा वेदच्या गळ्यात अडकल्याने त्याच्या गळ्यातील श्वास घेणारी व रक्त पुरवणारी नाळ कटली. त्यामुळे वेदला रक्तपात झाले. लगेच कृष्णाने त्याला जरीपटका जवळील जनता रुग्णालयात दाखल करण्यात आले. इथून त्याला मानकापूर आणि धंतोलीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी वेद ची सर्जरी करून कापल्या गेलेल्या नळ्यांना जोडल्या गेले. पण रविवारच्या सकाळी त्याची प्रकृती जास्त बिघडल्याने त्याचा मृत्यू झाला.
 
वेद आपल्या कुटुंबासोबत जरीपटका मिसाल ले-आऊट नागभूमी सोसायटी येथे राहायचा. त्याच्या वडिलांची एक किराणा दुकानाचे व्यापारी आहेत. कृष्णा आपल्या गाडीने (MH ४९ AX ७८८) मुलाला घेण्याकरिता जात होते.
 
काही दिवसांआधी अशीच एक घटना सामोरे आली होती जेव्हा एका १३ वर्षीय मुलाचे नायलॉन मांजामुळे गळा कापला गेला होता. दरवर्षी अश्या अनेक घटना सामोरे येत असतात. मात्र पोलीस प्रशासनाने यावर कार्यवाही केली असूनही, नागरिकांना अश्या अनेक घटनांना सामोरे जावे लागत आहे. या घटनेनंतर जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
चुक कोणाची?
 
नारा घाट वरती वेदचे अंतिम संस्कार करण्यात आले. या सर्वात नेमकी चूक कोणाची? हा प्रश्न सर्वत्र पाण्यासारखा तरंगत आहे. कार्यवाहीच्या नावाखाली काम न करणे अधिकारी, किंवा वारंवार सूचना दिल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करणारे नागरिक, या मग सूचना दिल्यानंतरही काळजी न घेणारे पालक? असे अनेक प्रश्नचिन्ह पोलिसांवर उभे झाले आहेत. या प्रकरणानंतर नागरिकांमध्ये संतप्त पसरलेला आहे. मात्र या सर्वात चिमुकल्या वेद ची काय चूक होती. न तो पतंग उडवीत होता, ना पतंग पकडण्यासाठी तो रस्त्यावर उतरला होता. तरी नायलॉन मांजामुळे चिमुकल्या वेदचा जीव का गेला.