भूकंपाच्या झटक्याने हादरली इंडोनेशियातील उत्तरी सुमात्राची जमीन

    16-Jan-2023
Total Views |

earthquake in northern sumatra of indonesia
(Image Source : Internet/representative)
 
जकार्ता:
 
इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटाच्या किनाऱ्याजवळ भूकंपाचे झटके जाणवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी पहाटे हा भूकंप झाला असून स्थानीय लोकांना जोरदार झटक्याचे अनुभव झाले. लोक घाबरून घराबाहेर पडले आणि सुरक्षित स्थळाकडे धावू लागले.
 
युरोपियन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्र (EMSC) ने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल इतकी असून भारतीय वेळेनुसार पहाटे ३ वाजून ५९ मिनिटांनी भूकंप आला. भूकंपाची खोली जवळपास १० किमी इतकी असल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाल्याचे अद्याप वृत्त नाही आहे.
 
 
इंडोनेशियामध्ये सतत भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक आणि त्सुनामीच्या घटना होतच राहतात. गेल्यावर्षी देखील इंडोनेशियातील पश्चिम जावा येथे ५.६ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपामुळे जवळपास ३३१ लोकांचा मृत्यू झाला होता. जवळपास १००० हुन अधिक लोक जखमी झाले होते. परंतु सुदैवाने यावेळी कुठलीही जीवितहानी झाल्याचे अद्याप समोर आले नाही आहे.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.