'या' खास पदार्थांसह साजरा करा पोंगल

    15-Jan-2023
Total Views |
 
pongal special recipe
  (Image Source : Internet)
 
नागपूर:
पोंगल हा दक्षिण भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे. हा सण प्रामुख्याने तामिळनाडूमध्ये साजरा केला जातो. भारताच्या उत्तर भागात मकर संक्रांत तर दक्षिण भागात पोंगल साजरा केला जातो. तमिळ लोकांमध्ये पोंगल या सणाला खूप महत्त्व आहे. हा सण साजरा करताना दक्षिण भारतात काही खास पदार्थ बनविले जातात, जे चविष्ट असण्याबरोबरच आरोग्यासाठी फायदेशीर देखील असतात. चला तर जाणून घेऊया पोंगल स्पेशल रेसिपी.
 
पाल पायसम:
 
Pal Payasam
  (Image Source : Internet)
 
साहित्य:
तांदूळ- १/२ कप
दूध- १ लिटर
विलायची पावडर- १ छोटा चमचा
साखर- १/२ कप
तूप- २ छोटा चमचा
बारीक चिरलेला सुका मेवा- आवडीनुसार
केसर- २ ते ३ काड्या दुधात भिजवलेल्या 
 
कृती:
सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि जवळपास अर्धा तास पाण्यात भिजायला ठेवा. आता एका भांड्यात दूध गरम करा. दुधाला उकळी आली की त्यामध्ये तांदूळ घाला. तांदूळ शिजून मऊ होऊद्या. आता यामध्ये वेलची पावडर आणि साखर घालून चांगल्याने मिक्स करा. आता एका दुसऱ्या पॅनमध्ये तूप गरम करा. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये सुका मेवा घालून हलके भाजून घ्या. आता हा भाजलेला सुका मेवा तांदूळ आणि दुधाच्या मिश्रणात घालून चांगल्याने मिक्स करून घ्या. यानंतर दुधात भिजलेली केसर घाला. अगदी सोप्या आणि झटपट पद्धतीने तयार आहे स्वादिष्ट पायसम. 
  
वेन पोंगल:
ven pongal (Image Source : Internet)
साहित्य:
मुंग डाळ- ३/४ कप
तांदूळ- ३/४ कप
जिरा- १ छोटा चमचा
आल्याचे पेस्ट- १ छोटा चमचा
कढी पत्ता- ८-९
हिरवी मिर्ची- ५-६ मधातून चिरलेली
कोथिंबीर- बारीक चिरलेली
काजू- आवडीनुसार
हळद- ३/४ छोटा चमचा
मीठ- आवश्यकतेनुसार
तूप- दीड चमचा
 
कृती:
सर्वप्रथम प्रेशर कुकरमध्ये तांदूळ आणि मुंग डाळ घाला. नंतर यात जवळपास ६ कप पाणी घालून कुकरचे झाकण बंद करा आणि ४ ते ५ शिट्टी घेऊन खिचडी शिजवून घ्या. आता एका पॅनमध्ये तूप गरम करा आणि त्यामध्ये जिरे आणि कढीपत्ता घाला. यामध्ये आल्याची पेस्ट आणि हिरवी मिर्ची घालून चमच्याने ढवळून घ्या. आता काजू घाला. यानंतर हळद आणि तिखट घालून मिक्स करा. आता शिजवलेली खिचडी यामध्ये घालून चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या. आवश्यकतेनुसार पाणी घालून पुन्हा एकदा मिक्स करा. आता हे संपूर्ण मिश्रण ५ मिनिटांपर्यंत शिजवा. शेवटी यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालून एकजीव करून घ्या. तयार आहे गरमा गरम दक्षिण भारतीय पोंगल स्पेशल वेन पोंगल.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.