मकर संक्रांती २०२३: सर्वत्र पतंगोत्सवाची धूम

    14-Jan-2023
Total Views |

kite festival celebration all over india
 (Image Source : Internet)
 
नागपूर:
आपला भारत देश म्हणजे संस्कृती आणि धार्मिक सणांचे माहेरघर. येथे प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. असाच एक बहुप्रतीक्षित सण म्हणजे मकर संक्रांत. उत्तरायण किंवा पतंगोत्सव नावाने ओळखला जाणारा हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मकर संक्रांत सणानिमित्ताने घराघरात तिळगुळाचे लाडू, वड्या बनतात. याशिवाय तिळाचे लाडू, चिक्की, गजक यांसारखे अनेक पदार्थ आपल्याला खायला मिळतात. पण, यापेक्षाही जास्त उत्सुकता असते ती पतंग उडवण्याची.

kite festival celebration all over india (Image Source : Internet) 
 
मकर संक्रांत हा सण म्हणजे पतंगोत्सव. जानेवारी महिना आला की, अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वच जण संक्रांतीची आतुरतेने वाट बघत असतात. डिसेंबर महिना अर्धा गेला नाही गेला की लहान मुलांना वेड लागते ते पतंग उडवण्याचे. शाळेची कधी सुट्टी होते आणि कधी घरी जाऊन पतंग उडवतो, असेच साऱ्या मुलांना वाटत असते. भारतात बऱ्याच ठिकाणी पतंगोत्सव साजरा केला जातो, परंतु संक्रांतीची खरी धूम असते ती गुजरातमध्ये.
 
kite festival celebration all over india (Image Source : Internet) 
गुजरात राज्याच्या भूजमध्ये मकर संक्रांतदरम्यान 'रण उत्सव' साजरा केला जातो, जो केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे.
 
kite festival celebration all over india
  (Image Source : Internet)
 
कोरोना काळानंतर यंदाचा पतंग महोत्सव हा भव्य असणार आहे.
 
kite festival celebration all over india
(Image Source : Internet)
 
अहमदाबादमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पतंग महोत्सव साजरा केला जातो. यादरम्यान अनेक विदेशी पर्यटक या भव्य उत्सवात सहभागी होतात.
kite festival celebration all over india
  (Image Source : Internet)
 
पतंग महोत्सवादरम्यान सर्वत्र केवळ एकाच आवाज ऐकू येतो, तो म्हणजे 'काई पो चे'.
 kite festival celebration all over india
  (Image Source : Internet)
 
केवळ गुजरातमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात मकर संक्रांत उत्साहाने साजरा केला जातो. प्रत्येक गल्लीत, मैदानात, घराच्या गच्चीवर सर्वजण पतंग उडवतांना दिसतात.
kite festival celebration all over india
  (Image Source : Internet)
 
महाराष्ट्रात तिळगुळाच्या गोडीबरोबर 'तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला' असे म्हणत हा सण साजरा केला जातो.
 
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.