गणपती विसर्जनासाठी नेसा पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने नऊवारी साडी

    09-Sep-2022
Total Views |

actress in nauvari saree (Image Source : Internet)
नागपूर :
महाराष्ट्राचा मानबिंदू असलेले गणेशोत्सव हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. घरोघरी बाप्पाची पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते. पाहता पाहता हा १० दिवसांचा हा उत्सव अखेर आज संपणार आहे. बाप्पा आज आपल्या सर्वांचा निरोप घेऊन आपल्या गावी परतणार आहे.
भाविकांच्या मनात जरी बाप्पाला निरोप देण्याची इच्छा नसली तरी ढोल-ताश्याच्या गजरात आज जागोजागी बाप्पाचे विसर्जन केले जाणार आहे. बाप्पाला पुढच्या वर्षी पुन्हा लवकर या, असा संदेश देखील दिला जाणार आहे. अशात महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धूम काही वेगळीच असल्याने विसर्जनाच्या दिवशी पारंपरिक महाराष्ट्रीय नऊवारी साडी बाप्पाला निरोप देण्याची वेगळीच भावना असते. चला तर मग जाणून घेऊया अगदी सोप्या आणि सध्या पद्धतीने नऊवारी साडी कशी नेसायची ते.
 
पारंपरिक महाराष्ट्रीय लूक देण्यासाठी पैठणीपासून ते चंदेरी, माहेश्वरी आणि पुणेरीसारख्या साड्यांचे भरपूर प्रकार आहेत. पण सगळ्यात खास आणि एकदम हटके लूक देणारी म्हणजे नऊवारी साडी. नऊवारी साडी ही अनेक प्रकारच्या कापडामध्ये आढळले. ही मुळात नऊ गजांची साडी आहे आणि तिला नेसण्याची एक विशेष पद्धत आहे. आजही मोठ्या आणि खास प्रसंगी स्त्रिया नऊवारी साडी नेसतात.
 
amruti in navvari 
अशी नेसा नऊवारी साडी
सर्वप्रथम कमरेभोवती साडीचा एक फेर देऊन समोर गाठ बांधा. आता साडीच्या लहान टोकाला धरून पायाच्या मध्यभागातून बाहेर काढून पाठीच्या बाजूने मध्यभागी खोचा. आता साडीचे लांब टोक पकडून ५ ते ६ प्लेट बनवा. यानंतर या प्लेट्स समोरून कमरेच्या मध्यभागी खोचा. आता ४ ते ५ प्लेट्सचा पदर बनवा. आता पदराला कमरेच्या मागून समोर आणा आणि डाव्या खांद्यावर सेफ्टीपिनच्या मदतीने सेट करून घ्या.
दागिने कोणते घालावे?
नऊवारी साडीतील लूक पारंपरिक नथ घातल्याशिवाय अपूर्ण वाटते. नथ घातल्यानंतर गळ्यात हार घाला, कानात कानातले घालून तयार व्हा. आता साडीच्या रंगला अनुसरून हातात काचेच्या बांगड्या घाला. सुंदर अशी अर्ध चंद्रकोर टिकली लावा. यानंतर आपल्या आवडीनुसार केसांचा जुडा घाला किंवा केस मोकळे ठेवा. संपूर्ण महाराष्ट्रीयन लूक देण्यासाठी जूड्याला आता सुंदर मोगऱ्याचा किंवा कुंदाचा गजरा बांधा. अशा पद्धतीने संपूर्ण पारंपरिक महाराष्ट्रीय लूकमध्ये बाप्पाची पूजा करा.
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.