दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, असा करा ऑनलाईन अर्ज

    07-Sep-2022
Total Views |

scholarship
(image source interner) 
नागपूर:
 
भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, विकलांग व्यक्ती सबलीकरण विभागामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सबलीकरणासाठी शालांतपूर्व (प्री मॅट्रिक), शालांत परिक्षोत्तर आणि उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
 
शालांतपूर्व (प्री मॅट्रिक) शिष्यवृत्तीसाठी 30 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज करायचे आहेत. अर्जांची पडताळणी 16 ऑक्टोबर 2022 पर्यंत होईल. शालांत परिक्षोत्तर आणि उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. अर्जांची पडताळणी 15 ऑक्टोबर 2022 पर्यंत होईल.
 
शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांना डीबी मार्फत पीएफएमएस द्वारे थेट पाठवली जाते. अर्ज शिष्यवृत्ती पोर्टल  www.scholarship.gov.in वर व अर्जाचा नमूना आणि सविस्तर माहिती www.disabilityaffairs.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. दिव्यांग विद्यार्थ्यानी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जि. प. च्या जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.