धक्कादायक! बंदिवासात असणाऱ्या कैद्यांना HIV संक्रमण

    07-Sep-2022
Total Views |

jail
(image source internet)

लखनौ:
काही ना काही कारणाने तुरुंगात बंदीस्त असलेल्या कैद्यांचा बाहेरच्या जगाशी तसा संपर्क येत नाही. असे असताना उत्तर प्रदेशच्या एका तुरुंगातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. बंदीवासात असणाऱ्या कैद्यांना HIV चे संक्रमण झाले आहे. राज्यातील बाराबंकी तुरुंगात गेल्या महिनाभरात २६ एचआव्ही पॉझिटिव्ह कैदी सापडले आहेत.
उत्तर प्रदेशच्या मध्यवर्ती कारागृहांमध्ये HIV चां संसर्ग पसरण्याचा धोका सातत्याने वाढत चालला आहे. गेल्या १0 ऑगस्ट ते 0१ सप्टेंबर या कालावधीत बाराबंकी कारागृहात ३ टप्प्यांत आरोग्य शिबिर घेण्यात आले. ज्यात त्यांची HIV चाचणी करण्यात आली. तपासणी दरम्यान २६ कैद्यांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. यापैकी ४ कैद्यांवर एआरटी उपचार सुरू होते. आता नवीन २२ रुग्णांवर एआरटी करण्यात येणार आहे.
बाराबंकी तुरूंगात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर, आता कारागृहात बंद असलेल्या महिला कैद्यांच्याही चाचण्या केल्या जाणार आहे. या कारागृहात सुमारे एक हजार कैदी आहेत. अशा प्रकारे कैद्यांमधे HIV संसर्ग होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.