Raju Srivastava Health Update: राजू श्रीवास्तव यांनी डोळे उघडले अन्...

06 Sep 2022 19:45:25

Raju Srivastava Health Update (Image Source : Internet)
मुंबई : 
प्रसिद्ध कॉमेडियन आणि भाजपा नेते राजू श्रीवास्तव यांना १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालावत चालल्याने त्यांना बऱ्याच दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मंगळवारी त्यांच्याविषयीचे महत्वाचे अपडेट आले आहे. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत आता हळूहळू सुधारणा होत असून आज त्यांनी डोळे उघडून त्यांची पत्नी शिखा यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. 
 
गेल्या बऱ्याच दिवसांपासून राजू श्रीवास्तव यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरु होते. आज मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांनी डोळे उघडून पत्नी शिखा यांच्याकडे पाहिले. त्यांच्याशी डोळ्यांनीच संवाद साधण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर किंचित त्यांच्या हातापायाची हालचाल व्हायलाही सुरुवात झाली आहे.
 
राजू यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना त्यांचे मुख्य सल्लागार अजित सक्सेना म्हणाले की, 'राजू भैया यांच्या प्रकृतीत सुधार होत आहे. हळूहळू त्यांच्या हाता-पायांची हालचाल व्हायलाही सुरुवात झाली आहे. तसेच त्यांनी आज डोळे उघडून पत्नी शिखा यांच्याकडे पाहिले आणि त्यांच्या हाताला स्पर्श करून संवाद साधण्याचा प्रयत्न केला.
 
दरम्यान, एका हॉटेलमधील जिममध्ये वर्कआउट करत असताना राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला होता. ते अचानक ट्रेडमिलवर कोसळल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवळपास गेल्या एक महिन्यापासून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या राजू यांना एकदा शुद्ध आली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी पुन्हा डोळे बंद करून घेतले होते. वारंवार ताप येत असल्यामुळे राजू यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सध्या त्यांचा ताप उतरला असल्याची माहिती राजू यांच्या भावाने दिली आहे. 
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
 
Powered By Sangraha 9.0