Behind the Scenes : बघा 'ब्रम्हास्त्र'च्या सेटवरून रणबीर-आलियाची खास झलक

    05-Sep-2022
Total Views |

ranbir-alia special glimpse (Image Source : Internet)
 
मुंबई :
सप्टेंबर महिना चित्रपट चाहत्यांसाठी आनंदाचा ठरणार आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे चाहते त्यांच्या आगामी चित्रपट 'ब्रम्हास्त्र'ची उत्सुकतेने वाट बघत आहेत. पाच दिवसांनी हा चित्रपट सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी दिग्दर्शक अयान मुखर्जीने चित्रपटाच्या पडद्यामागील रणबीर-आलियाची एक झलक शेअर केली आहे.
 
 
 
अयान मुखर्जीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, महानायक अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्या मुख्य भूमिका असून व्हिडिओमध्ये त्यांनी चित्रपटासाठी केलेली मेहनत दिसून येत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अयान मुखर्जी यांनी चित्रपटाबद्दल आपले प्रेम व्यक्त केले. व्हिडिओसोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्ये ते म्हणाले की, 'जिथे आध्यात्म आणि तंत्रज्ञान एकत्र येते... काल पहिल्यांदाच मी ब्रह्मास्त्रमधील प्रत्येक शॉट पाहिला. शेवटी पूर्ण झाला, पॉलिश झाला आणि प्रेक्षकांसाठी तयार झाला. माझ्यासाठी हा खूप भावनिक क्षण आहे. कारण प्रत्येक शॉटवर, ड्रॉइंग बोर्डपासून ते मोठ्या पडद्यापर्यंतचा तो प्रवास खूप मोठा आणि आव्हानात्मक होता. तंत्रज्ञानाद्वारे वाढणारी इतकी वर्षे साजरी करण्यासाठी आज काही पडद्यामागील दृश्ये शेअर करणे योग्य वाटले.'
 
 
 
यापूर्वी शनिवारी अयान मुखर्जी यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचा नवीन टिझर शेअर केला होता. अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्र चित्रपटात रणबीर कपूर शिवाची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटात शिवजवळ अग्नीची शक्ती आहे, तसेच आलिया शिवाच्या प्रेमिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच महानायक अमिताभ बच्चन चित्रपटात रणबीरचे गुरु आहेत. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनद्वारे निर्मित हा चित्रपट २०१४ पासून चर्चेत आहे. हा चित्रपट तीन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यातील पहिला भाग ब्रम्हास्त्र पार्ट १ : शिवा ९ सप्टेंबर रोजी रिलीज होण्यार आहे. ब्रम्हास्त्र चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.