बाप्पासाठी अगदी १० मिनटात तयार करा स्पेशल चॉकलेट मोदक

04 Sep 2022 18:12:36
 
chocolate modak (Image Source : Internet)
 
 
नागपूर :
गणपती बाप्पा म्हंटलं की मोदकांची आठवण आलीच पाहिजे. बाप्पा आणि मोदकांचं नातं कस एकदम घट्ट असते. गणपती बाप्पाच्या नुसत्या स्मरणानेसुद्धा अनेकांच्या डोळ्यासमोर मोदकांचे ताट येते. त्यातल्यात्यात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच चॉकलेट प्रिय असते. आता जर मोदक आणि चॉकलेट खायला मिळाले तर? गणेशोत्सवात बाप्पाला आवडणाऱ्या मोदकाच्या आकारात सुद्धा हे चॉकलेट मोदक मिळू लागले आहेत. हे चॉकलेटे मोदक घरीच तयार करता येतात. चला तर पाहूया चॉकोलेट मोदक अगदी १० मिनिटात आणि कमी साहित्यात कसे तयार करावेत.
साहित्य
पाव कप खवा (कोरडा करून घेतलेला)
पाव कप पिठीसाखर
२ चमचे कोको पावडर
बारीक चिरलेले काजू, बदाम, पिस्ता
कृती
कोरड्या केलेल्या खव्यामध्ये पिठीसाखर घालून एकत्र करून घ्या. थोडे थोडे करून त्यात कोको पावडर घाला.आता कोको पावडर खवा आणि साखरेच्या मिश्रणाला चांगल्या पद्धतीने एकत्र करून घ्या. यात बारीक चिरलेले काजू, बदाम, पिस्ता घालून एकत्र करा. हे मिश्रण अगदी घट्ट झाले पाहिजे. जर घट्ट होत नसेल तर त्यात आणखी कोको पावडर घालू शकता. आता तयार झालेल्या मिश्रणाचे छोटे गोळे करून त्याला मोदकाचा सुंदर असा आकार द्या. अशाप्रकारे बाप्पासाठी अगदी सध्या आणि सोप्या पद्धतीने १० मिनिटात चॉकलेट मोदक तयात करा. हे मोदक चविष्ट मोदक बाप्पासह घरातील सर्व सदस्यांना नक्कीच आवडणार.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 
Powered By Sangraha 9.0