Navratri 2022 : नवरात्रीचे ९ दिवस आणि ९ रंगांचे महत्व

    26-Sep-2022
Total Views |

navratri colours
(image source : internet) 
 
नागपूर :
नवरात्र हा मुळात संस्कृत शब्द आहे, याचा अर्थ 'नऊ रात्र ' असा होतो. ९ दिवसांचा हा उत्सव संपूर्णतः देवी दुर्गाच्या पूजेसाठी समर्पित असतो. नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. भारतात चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. चैत्र नवरात्र ही एप्रिल- मे महिन्यात येते, तर शारदीय नवरात्र सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात साजरी केली जाते. यापैकी शारदीय नवरात्र ही संपूर्ण भारतात मोठी नवरात्र म्हणून ओळखली जाते. या नऊ दिवसांच्या उत्सवात प्रत्येक दिवशीच्या ९ रंगांना विशेष महत्व आहे. चला तर मग जाणून घेऊया या रंगांच्या महत्वाबद्दल...
 
दिवस १ : रंग पांढरा
आजपासून नवरात्रीची सुरुवात झाली असून ती शांत आणि शुद्ध मनाने करणे आवश्यक असते. त्यामुळे शांतता आणि शुद्धतेचे प्रतीक असलेल्या पांढऱ्या रंगाला आज विशेष महत्व असते. याशिवाय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीचे पूजन केले जात असून यावेळी तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावे.
 
दिवस २ : रंग लाल
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रम्हचारीणीची पूजा केली जाते. या दिवशी लाल रंग परिधान केला जातो. शुभ, सौंदर्य आणि निर्भयतेचे प्रतिक असलेला लाल रंग देवीला प्रिय आहे.
 
दिवस ३ : रॉयल ब्लु रंग 
नवरात्रीच्या सर्व रंगांमध्ये रॉयल ब्लु रंग हा सर्वात लोकप्रिय आहे. हा रंग आरोग्य आणि संपत्तीवर्धक असतो, असे मानले जाते. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीचे पूजन करत असताना हा रंग परिधान करून देवीला प्रसन्न करता येते.
 
दिवस ४ : पिवळा रंग
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्माण्डाची पूजा करत असताना पिवळ्या रंगाचे महत्व असते. पिवळा रंग तेज, आनंद आणि उत्साहाचा रंग असल्यामुळे देवीला प्रिय आहे.
 
दिवस ५ : हिरवा रंग
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते. या दिवशी हिरवा रंग शुभ मानला जातो. स्कंदमातेला हिरवा रंग प्रिय असतो. याशिवाय हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतिक आहे.
 
दिवस ६ : रंग राखडी
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. यादिवशी ग्रे (राखडी) रंग परिधान करावा. राखडी रंग नवरात्रीच्या सर्व नऊ रंगांपैकी शांत आणि शुद्ध रंग असून याला बुद्धिमत्तेचे प्रतिकही मानले जाते.
 
दिवस ७ : केशरी रंग 
नवरात्रीच्या सातव्या दिवशी ऑरेंज रंग परिधान करावा. ऑरेंज रंग हा उबदारपणा आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतिक मानला जातो. त्यामुळे या दिवशी देवीची पूजा करताना ऑरेंज रंग परिधान करावा.
 
दिवस ८ : मोरपंखी रंग 
नवरात्रीचा अथवा दिवस म्हणजे महाष्टमी. अर्थातच देवी महागौरीच्या पूजनाचा दिवस. या दिवशी देवीची पूजा करताना मोरपंखी (Peacock Green) रंगाचे महत्व आहे. मोरपंखी रंग हा विशिष्टता आणि व्यक्तिमत्व सूचित करतो. तसेच हा रंग करुणा आणि ताजेपणाचा प्रतिक आहे. त्यामुळे देवीची पूजा करताना मोरपंखी रंग परिधान करावा.
 
दिवस ९ : गुलाबी रंग
नवरात्रीचा नववा दिवस म्हणजे नवमी. नवमीला सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. यादिवशीचा विशेष रंग गुलाबी असतो. गुलाबी रंग हा दयाळूपणा, आपुलकी आणि सुसंवाद दर्शवतो. देवी सिध्दिदात्रीची पूजा करताना हा रंग परिधान केल्याने देवी प्रसन्न होते.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.