नवरात्रीतील अखंड ज्योतीचे काय आहे महत्व? जाणून घ्या

    25-Sep-2022
Total Views |

navratri akhand jyot
(Image Source : Internet)
 
नागपूर :
उद्यापासून म्हणजे २६ सप्टेंबरपासून यावर्षीच्या शारदीय नवरात्री उत्सवाची सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या या ९ दिवसीय उत्सवात देशभरात भक्तिमय वातावरण असते. बऱ्याच ठिकाणी दुर्गा देवीची प्रतिमा स्थापित केली जाते. घरोघरी घटस्थापना केली जात असून यावेळी भाविक देवीसमोर अखंड ज्योत लावतात. या अखंड ज्योतीला संपूर्ण ९ दिवसांपर्यंत सातत्याने प्रज्वलित ठेवणे फार महत्वाचे असते, असे मानले जाते. तसा तर दररोज आपण देवासमोर दिवा लावतो. परंतु, नवरात्रातील अखंड ज्योतीला विशेष महत्व आहे. सहसा बहुतेकांना अखंड ज्योतीचे महत्व माहिती नसते. चला तर मग जाणून घेऊया नवत्राच्या या विशेष अखंड ज्योतीचे नेमके काय महत्व आहे.
 
नवरात्रीच्या ९ दिवसांच्या उत्सवात देवीच्या नऊ विशेष रूपांचे पूजन केले जाते. घटस्थापनेबरोबरच देवी समोर एक विशेष ज्योत लावली जाते, ज्याचे अखंडपणे जळत राहणे फार महत्वाचे मानले जाते. नवरात्र म्हणजे आपल्या मनातील भक्तिभाव जिवंत ठेवण्याचा जणू एक मार्गच. देवी समोरील अखंड ज्योतीला आपल्या मनातील भक्ती, शक्ती आणि विश्वासाचे प्रतीकही मानले जाते. ज्याप्रकारे भाविक ही ज्योत खंडित होऊ न देण्यासाठी प्रयत्न करतात, त्याचप्रकारे आपल्या मनातील भक्ती, शक्ती आणि विश्वासही नेहमी अखंडित रहावा, असा या मागचा उद्देश असतो.
 
ज्योतीला अखंडित ठेवण्यामागचा आणखी एक उद्देश म्हणजे महादेवाच्या ज्ञानदीपला प्रकाशित ठेवणे असाही होतो. कुठल्याही पूजेची, मंगलकार्याची सुरुवात ही दीप प्रज्वलित करूनच होते. तसेच आरती केल्यानंतर पूजा संपन्न होते. असे म्हटले जाते की, ज्या घरात दररोज दिवा लावून शंखनाद करून पूजा केली जाते, त्या घरात नेहमी देवी-देवतांचा वास असतो.
 
ज्योतीला अखंड ठेवण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या :
दिवा अखंड ठेवण्यासाठी यात वापरली जाणारी वात ही नेहमी लांब आणि जाड असावी. तसेच दिव्यातील तेलाकडे सुद्धा सातत्याने लक्ष ठेवणे महत्वाचे असते. अखंड ज्योत खिडकी-दरवाज्यापासून दूर ठेवा, जेणेकरून थेट हवेमुळे दोव्याची ज्योत विजू नये. दिव्याला अखंड ठेवण्यासाठी बाजारात काचेचे विशिष्ट्य आवरण सहजपणे उपलब्ध असतात, तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. याव्यतिरिक्त बाजारात मातीचे सुद्धा दिवे उपलब्ध असतात.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.