क्रिकेट सामाना दिनी महामेट्रोची ८१ हजार प्रवासी संख्या

    25-Sep-2022
Total Views |
 
metro photo
 image source@twnagpur metro rail
 
नागपूर:
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान टी२० सामना काळ विदर्भ क्रिकेट असोशिएशन (व्हीसीए) च्या जामठा स्टेडियम वर संपन्न झाला. या सामन्याच्या दिवशी महा मेट्रोने ८०,७९४ रायडरशिप प्रस्थापित केली. नुकतेच १५ ऑगस्ट ला ९०,७५८ प्रवासी संख्या नोंद केल्या नंतर महा मेट्रोने परत एकदा मोठ्या संख्येने प्रवासी संख्येची नोंद केली. म्हणजे स्वातंत्र्य दिनाला प्रस्थापित केलेल्या नंतर विक्रमी आकडेवारी नंतर एक महिना आणि काही दिवसाटाच महा मेट्रोने हा विक्रम नोंदवला आहे.
 
न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशन येथून व्हीसीएतर्फे क्रिकेट रसिकांना स्टेडियमपर्यंत जाण्याकरता आणि तसेच परत आणण्याकरता बस गाड्यांची विशेष सोय देखील केली होती. या सोबतच आणखी एक महत्वाची बाब म्हणजे रात्री सामना संपल्यावर प्रवासी सेवा १ वाजे पर्यंत सुरु ठेवणार अशी घोषणा महा मेट्रोने केली होती. पण सामना संपल्यावर परत येणाऱ्या क्रिकेट प्रेमींचा ओघ बघता हि सेवा ३ वाजे पर्यंत महा मेट्रोने सुरु ठेवली होती. नागपूरकर आणि क्रिकेट प्रेमींच्या सोइ करता महा मेट्रोच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला.
 
 
सामन्याकरता येणाऱ्या रसिकांचा ओघ हा दुपार पासून सुरु झाला आणि सामन्याची वेळ जवळ आल्यावर तो वाढला. महा मेट्रोने न्यू एअर पोर्ट मेट्रो स्टेशन येथे पार्किंगची सोय केली होती. मेट्रो स्थानके क्रिकेट प्रेमींमुळे भरले होते आणि याची पूर्व कल्पना असल्याने महा मेट्रोने त्या संबंधाने तयारी देखील केली होती आणि कर्मचारी आणि अधिकारी तैनात केले होते.
तसे बघितल्यास गेल्या काही काळापासून महा मेट्रोच्या प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत आहे. काल महा मेट्रो तर्फे दिलेल्या या प्रवासी सेवेचा लाभ अनेकांनी घेतला. या पैकी आपल्या मित्रांसह सामना बघण्याकरता आलेल्या हरीश वागदेकर याने रात्री उशिरा पर्यंत मिळालेल्या या सोइ करता महा मेट्रोचे आभार मानले. रात्री ३ वाजे पर्यंत प्रवासी सेवा वाढवल्याने मला आपल्या मित्रांसह घरी परतणे सोईस्कर झाले, असे देखील तो म्हणाला.
रात्री उशिरा पर्यंत मिळाली हि प्रवासी सेवा महिला प्रवाश्यांकरता वरदान असल्याचे वैशाली गुप्ता या महिला क्रिकेट फॅन ने म्हटले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सामना संपल्यावर महा मेट्रोने ३ वाजे पर्यंत दिलेली हि सोय महिला प्रवाश्यांकरता अतिशय उपयुक्त ठरल्याचे देखील ती म्हणाली. या पुढे गरज भासेल तेव्हा महा मेट्रो अश्या प्रकारे सेवा देईल, हि अपेक्षा देखील वैशाली गुप्ता ने व्यक्त केली. सामना बघताना भारतीय संघाला चियर करणाऱ्या ज्या नागपूरकर आणि क्रिकेट प्रेमिंनी मेट्रोचा वापर करत केवळ ४० दिवसात दुसऱ्यांदा विक्रमी रायडरशिप असल्याचे सांगितल्या जात आहे.