टी-२० सामन्यासाठी जमाठा मैदान सज्ज; अशी असू शकते टीम इंडिया

23 Sep 2022 12:58:35

sports 
 
नागपूर : 
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० सामन्यासाठी विदर्भ क्रिकेट संघटनेचे जामठा मैदान पूर्णतः सज्ज झाले आहे. ऑस्ट्रेलियासोबतच्या तीन टी-20 मालिकेत भारत 1-0 ने पिछाडीवर आहे. आजचा सामना टीम इंडियासाठी करो किंवा मरोचा सामना आहे. भारताने विजय मिळवल्यास पुढील सामना जिंकून ऑस्ट्रेलियाचा विजय रथ रोखण्याची संधी असेल. त्याचबरोबर टी-20 मालिका सातत्याने जिंकणारा ऑस्ट्रेलियन संघ मालिका जिंकण्याच्या उदिष्टने उतरणार आहे. एकूणच आजचा सामना अतिशय रोमहर्षक होणार आहे.
 
 
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघात गोलंदाजीबाबत काही बदल पाहायला मिळू शकतात. जसप्रीत बुमराह परतला तर भुवनेश्वर कुमार किंवा उमेश यादवला बाहेर बसावे लागेल. भुवी आणि उमेश या दोघांच्या जागी बुमराह आणि दीपक चहरचा संघात समावेश होण्याची शक्यता आहे. गोलंदाजी हा भारतीय संघाचा कमकुवत दुवा राहिला आहे. मात्र, केएल राहुलने पहिल्याच सामन्यात अर्धशतक ठोकून अव्वल क्रमवारीत आपले स्थान पक्के केले आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुल हे भारतीय संघाचे सलामीवीर असतील. यानंतर विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या मैदानात उतरतील. विश्वचषकाच्या तयारीचा भाग म्हणून टीम इंडिया हे प्रयोग करत असल्याचे आशिया चषकावरूनच बोलले जात आहे. मात्र सध्याचा सामना न पाहता येत्या विश्वचषकाची तयारी करणे योग्य नसल्याचे क्रिकेट चाहत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच भारतीय संघात सातत्याने प्रयोग होत असून संघाला पराभवाला सामोरे जावे लागत आहे. कधी बॉलिंग फेल होते तर कधी बॅटिंग ऑर्डर बिघडतो. यासोबतच क्षेत्ररक्षण विभागही कमकुवत दिसत आहे. असे अनेक सामने घडले आहेत जिथे संघ फलंदाजीवर अधिक अवलंबून असतो आणि इतर क्षेत्रात अपयशी ठरतो आणि सामना गमावतो. टीम इंडियालाही या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.
 
 
असा असु शाकतो संभाव्य संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत/दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
Powered By Sangraha 9.0