सुनील छेत्रीला बाजूला करतांनाचा 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल

    20-Sep-2022
Total Views |

sunil chhetri
 (Image Source : tw/@chetrisunil11)
 
नवी दिल्ली :
जागतिक पातळीवर सर्वाधिक लोकप्रिय असणारा फुटबॉल हा खेळ भारतात तसा लोकप्रिय नाही. परंतु, भारतातील काही राज्यांमध्ये फुटबॉलची क्रेझ पाहायला मिळते. फुटबॉल प्रेमींसाठी अशीच एक स्पर्धा कोलकाता येथील सॉल्ट नेट स्टेडियमवर झाली. ड्युरंड चषक फुटबॉल स्पर्धा असे या स्पर्धेचे नाव होते. या स्पर्धेचा अंतिम सामनात सुनील छेत्रीच्या नेतृत्वातील बंगळुरु एफसी संघाने मुंबई सिटी एफसीचा पराभव केला.
सामना संपल्यानंतर पार पडलेल्या बक्षीस वितरण समारंभातील दोन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमात पुरस्कार देण्यासाठी आलेले पाहुणे फोटो काढण्यासाठी खेळाडूंपेक्षाही जास्त उत्साही दिसत होते. यावेळचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून ४0 हजारांपेक्षा जास्त जणांनी पहिले आहेत. अनेक फूटबॉल चाहत्यांनी हे व्हिडिओ पाहून आश्‍चर्य व्यक्त केले आहे.
हे व्हिडिओ पाहून, भारतातील या दिग्गज फूटबॉलपटूंना दिली जाणारी वागणूक फार वाईट असल्याचे नेटकरी म्हणत आहेत. देशातील खर्‍या आणि तरुण टॅलेंटच्या मध्ये हे राजकारणी लोक नेहमी उभे असतात, अशी कमेंट एका युजरने केली आहे. हे राजकारणी लोक आपल्याला काय समजतात अशी विचारणाही अनेकांनी केली आहे.
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.