taiwan earthquake; इमारती जमीनदोस्त, मोठं नुकसान

    18-Sep-2022
Total Views |

taipay
 (image souce internet) 
 
ताईपे:
 
तैवान मध्ये जोरदार भूकंपाचे धक्के बसले. त्यानंतर तैवानमध्ये त्सुनामी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तैवानच्या आग्नेय किनार्‍यावर ७.२ रिश्टर स्केलचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू ताइतुंग शहराच्या उत्तरेला सुमारे 50 किलोमीटर अंतरावर दहा किलोमीटर खोलीवर असल्याचे बोलल्या जात आहे. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
 
 
(socur internet) 
 
तैवानच्या आग्नेय किनारपट्टीला झालेल्या भूकंपाची माहिती देताना, यूएस भूगर्भीय सर्वेक्षणाने सांगितले की, भूकंपामुळे तैवानच्या युली शहरातील अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. किमान एक इमारत कोसळली आहे. भूकंपानंतर लोक घराबाहेर पळताना दिसले. बराच वेळ सर्वत्र गोंधळाचे वातावरण होते.
 
रेल्वे स्थानकांवर उभ्या असलेल्या गाड्या उलटल्या. युली शहरात अनेक ठिकाणी इमारतींचे नुकसान झाले आहे. दुकान कोसळल्याने अनेक लोक गाडले गेले. नंतर त्यांना वाचवून बाहेर काढता आले. जपानने तत्काळ भूकंपाचा इशारा जारी केला आहे. USGS ने सांगितले की, भूकंप दुपारी 2:44 वाजता (0644 GMT) ताईतुंग शहराच्या उत्तरेस 50 किलोमीटर (30 मैल) अंतरावर 10 किलोमीटर खोलीवर आला. त्याची ताकद प्रथम 7.2-मॅग्निट्यूड म्हणून नोंदवली गेली होती परंतु नंतर ती 6.9-मॅग्निच्युड म्हणून नोंदवली गेली.