...म्हणनू चित्तांसाठी निवडले कुनो राष्ट्रीय उद्यान

    18-Sep-2022
Total Views |
chitta
(image soucer @twitter)
 
नवी दिल्ली:
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवशी भारतात आठ नवीन पाहुण्यांचं आगमन झाले. नामिबिया येथून विशेष विमानाने भारतात आणण्यात आलेल्या चित्त्यांसाठी मध्यप्रदेशच्या शिवपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय पार्कची निवड करण्यात आली.सुमारे ७४८ चौरस किलोमीटरवर पसरलेले कुनो पालपूर नॅशनल पार्क ८ आफ्रिकन चित्त्यांचे नवीन घर असणार आहे. पण कुनोच का असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. तर जाऊन घेऊया या पाहुण्यांना कुनो येथे का, आणण्या आले तर.
 
 
मध्यप्रदेशच्या शिवपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय पार्क आहे. संपूर्ण जंगली भाग हा राजस्थान या राज्याच्या सीमेच्या जवळचा आहे. या भागाला सर्वजण चंबळ या नावाने ओळखतात कुनो अभयारण्य 1981 मध्ये बनविण्यात आले होते. तेव्हा तो भाग 359 स्क्वेअर किलोमीटर चा होता 2018 मध्ये तो भाग चारशे स्क्वेअर किलोमीटर वाढवून त्याला नॅशनल पार्क चा दर्जा देण्यात आला. आता त्याचा एकूण भाग 759 स्क्वेअर किलोमीटर म्हणजेच 75 हजार हेक्टर एवढा आहे.
 
 
 
चित्यासाठी मध्य प्रदेश मधील कुनो हेच अभयारण्य का निवडण्यात आले. याचे कारण आफ्रिकेतील चित्त्यांच्या राहण्याचा जंगली भाग व कुनो अभयारण्य यामध्ये बरीच समानता आढळते. आफ्रिकेच्या जंगलातील लांबलचक गवताच्या मैदानाला सवाना असे म्हणतात. यामध्ये चित्ता आपली शिकार व्यवस्थित करू शकतो.
 
आफ्रिकेतील सवाना सारखा भाग हा फक्त मध्यप्रदेशच्या कुनो या अभयारण्यातच बघायला मिळतो. कुनो अभयारण्यात चित्त्यांसाठी नऊ कॉरंटाईन सेंटर तयार केले गेले आहेत. जिथे हे पाच नर चित्ता व तीन मादी चित्ता ठेवण्यात आल्या आहेत. चित्त्याच्या शिकारीसाठी काही प्राणी बाहेरून येथे आणण्यात आले आहे. चित्ता प्रकल्पाच्या अंतर्गत 25 चित्त्यांना भारतात आणण्याचा प्रयत्न चालू असल्याचे सांगितल्या जात आहे. त्यासाठी टांझानिया, नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांसोबत भारताने करार केलेला आहे.
 
  
 
हा प्रकल्प यशस्वी करण्याकरिता मध्य प्रदेश सरकारसोबत केंद्र सरकार वाईल्ड लाईफ रिसर्च इन्स्टिट्यूट भारत आणि आफ्रिकेचे अनेक वन्यजीव तज्ञ मिळवून काम करत आहे. या चित्त्याना लगेच जंगलात न सोडता त्यांच्यासाठी स्टेप बाय स्टेप प्लॅन केला गेला आहे. जेणेकरून तेथील वातावरणात मिळून मिसळून राहू शकतील सर्वप्रथम आठ चित्त्यांना भारतात आणून क्वारंटाईन ठेवण्यात येईल नंतर तीन महिने त्यांना मर्यादित क्षेत्रात वावरण्यास पडण्यात येईल आणि जसे त्यांना या वातावरणाची सवय होईल तसे त्यांना जंगलात सोडण्यात येईल. अभयारण्यात सध्या तरस व बिबट्या राहतात आणि ते चित्यासाठी धोकादायक ठरू शकतात. चित्त्यांकरिता जागा बनविण्यासाठी 50 बी बी ते दुसरीकडे शिफ्ट केले आहे. चित्त्यासोबत यांची वागणूक कशी असेल यावर नजर ठेवण्यात येईल दहा बिबटे व दहा तरस यांच्या गळ्यात रेडिओ कॉलर लावण्यात आले आहे. शिवाय चित्त्यांच्या गळ्यात सुद्धा रेडिओ कॉलर लावण्यात आले आहे.
 
भारतासोबत आफ्रिका सुद्धा यावर नजर ठेवून असेल सगळीकडे कॅमेरे लावण्यात आले आहे जेणेकरून यांच्यावर व्यवस्थित नजर ठेवण्यात येईल अशा प्रकारे आपले नवीन पाहुणे म्हणजेच चित्ते यांच्या स्वागताची पूर्ण तयारी करण्यात आली आहे.