चॉकलेट आरोग्यासाठी फायदेशीर की नुकसानदायक? जाणून घ्या

    17-Sep-2022
Total Views |

chocolate benefits
(Image Source : Internet)
 
नागपूर :
काही पदार्थांचे नाव घेतले की लगेच आपल्या तोंडाला पाणी सुटते. त्या पदार्थाचे केवळ चित्र जरी बघितले, तरी ते खावेसे वाटते. चॉकलेट देखील त्याच पदार्थांपैकी एक आहे. साधारण चॉकलेटच्या तुलनेत डार्क चॉकलेट आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असते.
 
 
चॉकलेट म्हणजे अगदी लहान्यांपासून ते वयस्करपर्यंतच्या सगळ्यांना लालसा लावणारी गोष्ट. मात्र, चॉकलेट खाताना ते अधिक प्रमाणात खाल्ल्यास मनात अनेक प्रकारचे विचार येतात. चॉकलेट खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतात, असा अनेक लोकांना गैरसमज असतो. मात्र, चॉकलेट खाण्यामुळे नुकसान होण्यापेक्षा त्याचे बरेच फायदे आहे, हे जाणून तुम्हाला आश्चर्य होईल.
 
चॉकलेटबद्दल काही मजेशीर तथ्य
१. हृदयरोग आणि उच्च रक्तदाब यांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये चॉकलेटचा वापर खूप आधीपासून होत आलेला आहे.
२. चॉकलेटमध्ये अँटीऑक्सीडेंट्सचे प्रमाण जास्त असते.
३. काही अभ्यासानुसार चॉकलेटमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यात मदत होते.
४. डार्क चॉकलेट हे वजन कमी करण्यास किंवा वजन स्थिर ठेवण्यासही मदत करते. यासाठी योग्य प्रमाणात चॉकलेट खाणे कधीही उत्तम आहे.
५. मानसिक आरोग्यासाठी देखील चॉकलेट खूप फायदेशीर ठरते.
६. तणाव कमी करण्यास मदत करते.
 
चॉकलेट खाण्याचे फायदे
 
१. कोलेस्ट्रॉल
खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी चॉकलेट खाणे उपयोगी असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे.
 
२. स्मरणशक्ती वाढवण्यास मदत
दिवसातून २ कप हॉट चॉकलेट घेतल्याने मेंदू निरोगी राहण्यास आणि वृद्ध लोकांमधील स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते, असे हॉवर्ड मेडिकल शाळेच्या शास्त्रज्ञांनी सुचवले आहे.
३. हृदयरोग
चॉकलेटचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो, असे एका संशोधनात दिसून आले आहे.
 
४. गर्भाची वाढ आणि विकास
अटलांटा जीएमधील सोसायटी फॉर मॅटर्नल फेटल मेडिसिन्सच्या २०१६ च्या प्रेग्नन्सी मीटिंगमध्ये सादर केलेल्या अभ्यासानुसार, गर्भधारणेदरम्यान दररोज ३० ग्रॅम चॉकलेट खाल्ल्यास गर्भाची योग्य वाढ आणि विकासाला फायदा होऊ शकतो.
५. ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्यासाठी उपयुक्त
एका संशोधनानुसार, फिटनेस प्रशिक्षणादरम्यान डार्क चॉकलेट खाल्ल्यास शरीरातील ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्यासाठी मदत होते.
चॉकलेटचे सेवनाने होणारे नुकसान
 
१. वजन वाढणे
डार्क चॉकलेट वगळता इतर चॉकलेट्सचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास साखर आणि चरबीयुक्त पदार्थांमुळे कॅलरीमध्ये ज वाढ होते. परिणामी वजन वाढण्याची शक्यता असते.
 
२. दात किडण्याची शक्यता
काही चॉकलेटमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने दात किडण्याची शक्यता असते.
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.