पंतप्रधान मोदी SCO समिटसाठी आज रवाना होणार; 'या' मुद्द्यांवर करणार चर्चा

15 Sep 2022 18:55:04

pm modi to attend sco summit (Image Source : Internet)
नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय शिखर परिषदेत (SCO Summit) सहभागी होण्यासाठी २४ तासांच्या उझबेकिस्तान दौऱ्यावर जाणार आहेत. १५-१६ सप्टेंबर रोजी त्यांचा हा एक दिवसीय दौरा असणार आहे. पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी उझबेकिस्तानसाठी रवाना होणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती आहे.
 
शुक्रवारी समरकंद शहरात शांघाय शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला जाण्यापूर्वी परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींच्या उझबेकिस्तान दौऱ्याची माहिती दिली आहे. याशिवाय पंतप्रधान मोदींनी देखील उझबेकिस्तानसाठी रवाना होण्यापूर्वी, ते शांघाय शिखर परिषदेत (SCO Summit) स्थानिक, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले आहे.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय शिखर परिषदेत (SCO Summit) स्थानिक, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर, SCO च्या विस्तारावर आणि संघटनेतील बहुआयामी आणि परस्पर फायदेशीर सहकार्य अधिक गहन करण्यावर विचारांची देवाणघेवाण करण्यास उत्सुक असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या त्यांच्या उझबेकिस्तान भेटीपूर्वी दिली आहे.
 
विनय क्वात्रा याबाबत माहिती देताना म्हणाले की, उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्जियोयेव यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी तेथे दौऱ्यावर जात आहेत. पंतप्रधान मोदी शुक्रवारी सकाळी समरकंद येथील SCO प्रमुखांच्या २२व्या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. शिखर परिषदेत सहसा दोन सत्रे असतात. केवळ SCO सदस्य राष्ट्रांसाठी मर्यादित सत्र आणि निरीक्षक आणि विशेष निमंत्रितांसाठी विस्तारित सत्र असेल, असेही त्यांनी सांगितले.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
 
Powered By Sangraha 9.0