'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधून या महत्वपूर्ण व्यक्तीची एग्जिट

    13-Sep-2022
Total Views |

taarak mehta ka ooltah chashmah
(image source : internet)
 
मुंबई :
एकेकाळी छोट्या पडद्यावर अर्थात टीव्हीमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. हा कार्यक्रम कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा आवडता कार्यक्रम आहे. या मालिकेतील पात्र आपल्या मजेशीर अभिनयामुळे नेहमीच चाहत्यांना हसवत असतात. संपूर्ण देशातच नव्हे तर विदेशातही या मालिकेचे लाखो चाहते आहेत. घराघरात पहिली जाणारी ही मालिका गेल्या १५ वर्षांपासून प्रत्येकाची पहिली पसंती बनली आहे.
 
गेल्या काळापासून 'तारक मेहता का उल्टा चश्मा' आपल्या स्टारकास्टमुळे चर्चेत राहत आहे. सातत्याने स्टारकास्टमध्ये होत असलेल्या बदलामुळे ही मालिका चर्चेचा विषय बनला आहे. एकीकडे जिथे तारक मेहता म्हणजेच अभिनेता शैलेश लोढा आणि टप्पू म्हणजे राज अनादकत यांनी मालिका सोडली, तर दुसरीकडे नवीन तारक मेहताची एन्ट्री सुद्धा झाली आहे. शैलेश लोढा यांच्या जागी आता अभिनेता सचिन श्रॉफ तारक मेहताची भूमिका साकारताना दिसत आहे. मालिकेचे निर्माते आसित मोदी यांनी गेल्या एपिसोडमध्ये नवीन चेहरा मालिकेमध्ये बघायला मिळणार असल्याची हिंट दिली होती. यानंतर चाहत्यांनी आता असित मोदी यांनाच चेतावणी दिली आहे.

tarak mehta
 
 
चाहत्यांची आसित मोदी यांना चेतावणी
तारक मेहता म्हणजे शैलेश लोढा यांनी मालिका सोडल्यानंतर त्यांच्या जागी तारक मेहताची भूमिका निभावणारे सचिन श्रॉफ यांच्यासाठी चाहत्यांनी संमिश्रित प्रतिक्रिया दिली आहे. आताही चाहते जुन्या तारक मेहताला विसरू शकत नसून शैलेश लोढा यांच्या परतण्याची वाट बघत आहेत. मालिकेतून मोठे कलाकार सतत निघून जात असल्याने चाहते नाराज झाले आहेत. तसेच आता सर्वांचे आवडते जेठालाल देखील मालिका सोडणार असल्याची भीती चाहत्यांना वाटत आहे. त्यामुळे चाहते आता सोशल मीडियावर आसित मोदी यांच्यावर टीका करत आहेत.
 
जर जेठालाल म्हणजे दिलीप जोशी सुद्धा मालिकेत राहणार नाही? दिलीप जोशी देखील मालिका सोडून चालले जातील? असे प्रश्न चाहत्यांना पडत आहेत. त्यामुळे काही झाले तरी जेठालाल रिप्लेस होऊ नये, अशी चेतावणीच चाहत्यांनी आसित मोदी यांना दिली आहे. एका नेटकाऱ्याने म्हटले आहे की, 'कोणताही नवीन कलाकार आला तरी चालेल, पण मालिकेतून जेठालाल रिप्लेस नाही झाला पाहिजे.' तसेच एका दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले की, 'जेठालालच्या भूमिकेसाठी दिलीप जोशी यांचे डेडिकेशन लक्षणीय आहे, त्यांना कोणीही रिप्लेस करू शकत नाही.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.