Movie Review : ब्रम्हास्त्र : पार्ट 1 शिवा

10 Sep 2022 20:48:19

brahmastra part 1 shiva 
 
नागपूर : 
गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या चित्रपटाची सर्वांना प्रतीक्षा होती, तो चित्रपट म्हणजेच 'ब्रम्हास्त्र : पार्ट 1 शिवा' अखेर प्रदर्शित झाला. चित्रपट रिलीज होण्याआधीच बॉयकोट ब्रम्हास्त्र हा ट्रेंड होत होता. असो ट्रोलर्स यांना केवळ निमित्त मात्र हवं असतं. चित्रपट 3D मध्ये बघण्याची एक वेगळीच मजा आहे. काहीही लिहिण्याआधी चित्रपटाच्या निर्मात्यांचे कौतुक करावेसे वाटते. बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा व्हीएसएक्स (VFX) ने परिपूर्ण असलेला हा सिनेमा आहे.
 
चित्रपटाची सुरुवात शाहरुख खान पासून होते आणि मग खऱ्या अर्थाने आपण जातो अस्त्रांच्या दुनियेत. येथे एन्ट्री होते आपल्या हिरोची म्हणजेच शिवाची. चित्रपटात रणबीर कपूर ही भूमिका साकारतो आहे. हा DJ शिवा एका पार्टीमध्ये ईशा (आलिया भट्ट) ला बघतो आणि येथून खऱ्या अर्थाने चित्रपटाची स्टोरी सुरू होते. स्टोरी सुरू होताच शाहरुख खानच्या पार्टचा एन्ड होतो आणि आपल्याला ब्रम्हास्त्रची ओळख व्हायला लागते. मग मोनी रॉय (जोहर) ची एन्ट्री होते. नागीण नंतर तिला या भूमिकेत प्रेक्षक स्वीकारतील, अशी आशा आहे. त्यानंतर चित्रपटात काही काळासाठी नागार्जुन आपल्याला बघायला मिळतात. एका अस्त्राच्या भूमिकेत आता ती भूमिका कोणती आहे, ते चित्रपट बघितल्यावरच कळेल. पण या सगळ्यामध्ये शिवा (रणबीर कपूर) ची काय भूमिका आहे? तो कोणते अस्त्र आहे, या गोष्टी त्याच्या पुढे उलगडत जातात आणि या गोष्टी उलगडण्याचे काम करतात गुरुजी म्हणजेच अमिताभ बच्चन.
 
बच्चन साहेबांच्या अभिनयाचे कौतुक करावे तितके कमी आहे. कोणत्याही भूमिकेला आपलेसे कसे करायचे हे या महानायकला बरोबर जमते. चित्रपट 3D मध्ये बघण्याला अधिक प्राधान्य द्यावे लागले. कारण 3D मध्ये सगळे इफेक्ट्स अगदी छान उठून दिसतात.
 
आता येऊयात गाण्याकडे, बाकीच्या चित्रपटांप्रमाणेच 25 मिनिटे गाण्यांनी खाल्ली आहेत. या गाण्यांमुळे शिवा आणि ईशाची काजळाच्या शाईने लिहिलेली लव्हस्टोरी फुलून येते.
 
चित्रपटामध्ये डिंपल कपाडियाची देखील एक छोटीशी भूमिका आहे. बऱ्याच दिवसांनी डिंपल कपाडियाला मोठ्या पडद्यावर बघून एक वेगळाच आनंद मिळतो. या चित्रपटात ईशाचा एक डायलॉग आहे, ईशा का मतलब होता है पार्वती और शिवा के साथ तो हमेशा पार्वती जुडी होती है.
 
ओव्हरऑल इस स्टोरी में इमोशन्स है, ऍक्शन है और बहोत सारा मेलोड्रामा है,
सध्या पार्ट 1 बद्दल इतकेच बास.. बाकी तुम्ही चित्रपट नक्की बघा, आणि दुसऱ्या पार्टची उत्सुकता आतापासूनच लागलेली आहे.
 
 
- RJ सिद्धेश राजगुरू
 
Powered By Sangraha 9.0