प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड

    09-Aug-2022
Total Views |

actor pradeep patwardhan (Image Source : Internet)
 
मुंबई :
सिनेसृष्टीतून मंगळवारी सकाळी दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. गिरगाव येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.
 
मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम करून प्रदीप पटवर्धन यांनी मनोरंजन क्षेत्रात आपली एक नवीन ओळख निर्माण केली होती. ते मुख्यतः एक विनोदी अभिनेता म्हणूनही ओळखले जात. बालपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. त्यांच्या अशा अचानक निघून जाण्याने मराठी सिनेजगतात शोककळा पसरली आहे.
 
प्रदीप पटवर्धन यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. एक फुल चार हाफ (१९९१), डान्स पार्टी (१९९५), मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (२००९), गोळा बेरीज (२०१२), बॉम्बे वेल्वेट (२०१५), पोलिस लाइन (२०१६), एक दोन तीन चार आणि नवरा माझा नवसाचा (२०१६), परीस (२०१३), थँक यू विठ्ठला (२०१७) आणि चिरनेर (२०१९) या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय पटवर्षण यांनी अमोल भावेच्या जर्नी प्रेमा (२०१७) या चित्रपटातही काम केले आहे.
 
नाटकांमधील प्रवासाबद्दल बोलायचे झाला तर, प्रदीप पटवर्धन यांनी 'मोरूची मावशी' या नाटकात साकारलेल्या भूमिकेमुळे त्यांना प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. पटवर्धन यांना २०१९ मध्ये अखिल भारतीय नाट्य परिषद पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.