माझी मेट्रोत रंगणार विविध स्पर्धा

    07-Aug-2022
Total Views |
 
metro
(pic-internet) 
नागपूर:
प्रवाश्यांच्या सोइ करता महा मेट्रो नेहमीच विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असते. फूड फेस्टिवल, गीत-संगीत असे कार्यक्रम प्रवाश्यांकरता सादर केले. याच शृंखलेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त महा मेट्रोने शहरातील नागरिकांकरता कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. देशात सर्वत्र हर घर तिरंगा अभियान राबवले जात असताना मेट्रोने देखील यात मोठ्या प्रमाणात सह्भाग घेतला असून या प्रमाणे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
लकी ड्रॉ स्पर्धा:
 
१० ते १५ ऑगस्ट दरम्यान मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांकरिता लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी मेट्रो स्टेशन वर उपलब्ध असलेल्या बॉक्स मध्ये मेट्रो तिकीटच्या मागे आपले नाव व मोबाईल क्रमांक लिहून जमा करावे. महा कार्डचा वापर करणारे प्रवासी देखील यात सहभागी होऊ शकतात. महा कार्ड वापरणाऱ्यांनी एका कागदावर प्रवासाची तारीख, वेळ, कुठल्या स्टेशन पासून कुठल्या स्टेशनवर, नाव, महा कार्ड आणि मोबाईल क्रमांक लिहून बॉक्स मध्ये टाकावा. स्पर्धेचा निकाल दुसऱ्या दिवशी घोषित केल्या जाईल.
 
चित्रकला स्पर्धा :
 
दिनांक १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १०.१५ वाजता पर्यत - म्हणजे ७५ मिनिटांच्या कालावधीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्य चित्रकला स्पर्धा झिरो माईल फ्रिडम पार्क येथे आयोजित केली जाईल. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धाकाला ७५ मिनिटांचा वेळ दिला जाईल तसेच या चित्रकला स्पर्धेचा विषय `स्वातंत्र्याचे ७५ वर्ष आणि नागपूरच्या परिवहन व्यवस्थेचे बदलते स्वरूप' असा आहे. सदर स्पर्धा सर्व वयोगटा करिता खुली असून जास्तीत जास्ती स्पर्धकांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन महा मेट्रो तर्फे करण्यात येत आहे.
 
फ्रिडम फायटर मेट्रो राईड:
 
स्वतंत्रता सैनानी करिता १० ऑगस्ट रोजी फ्रिडम फायटर मेट्रो राईडचे आयोजन उन्नती फाउंडेशनच्या माध्यमाने या राईडचे आयोजन करण्यात आले आहेत.
 
हर घर तिरंगा विश वॉल कॅम्पेन:
 
सिताबर्डी इंटरचेंज आणि लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन येथे मेट्रो प्रवाश्यांनकरिता हर घर तिरंगा विशवॉल कॅम्पेनचे आयोजन करण्यात आले आहेत ज्याठिकाणी मेट्रो प्रवासी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य शुभेच्छा नोंदवू शकतात.
 
मेट्रो स्टेशन येथे बँडचे सादरीकरण:
 
सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि नागपूर शहर पोलिसांच्या वतीने मेट्रो स्टेशन येथे १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान बँडचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

देशभक्ती गीतांचे आयोजन :
 
झिरो माईल फिडम पार्क मेट्रो सतेसहन आणि सिताबर्डी इंटरचेंज येथे १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशभक्ती गीतांचे आयोजन करण्यात आले आहेत.
 
सेल्फी पॉईंट:
 
महा मेट्रोने मेट्रो स्टेशन निर्माण कार्य सोबतच स्टेशन परिसरात अनेक आकर्षक अश्या सुंदर वास्तू शहरात तयार केल्या आहेत याच अनुषंगाने एयरपोर्ट मेट्रो स्टेशन येथील बापू कुटी,झिरो माईल फिडम पार्क येथे तयार करण्यात आलेल्या ऐतिहासिक वास्तू तसेच दोसर वैश्य चौक येथे स्टेशन येथे तयार करण्यात आलेल्याविजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा उंचा रहे हमारा या म्युरल सोबत सेल्फी काढून सोशल मीडिया वर "नागपूर मेट्रोला टॅग करण्याचे आवाहन महा मेट्रोच्या वतीने करण्यात आले आहेत.