ज्येष्ठ अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन

    04-Aug-2022
Total Views |

mithilish chaturvedi(Image Credit: Internet) 
मुंबई:
चित्रपट सृष्टीचे आणि टीव्हीच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन झाले. पण बुधवार संध्याकाळी लखनौमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
mithilish chaturvedi 
 
मिथिलेश चतुर्वेदी यांनी ताल, रेडी, फिजा, कोई मिल गया, सत्या, हल्ला बोल यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते हृदयाशी संबंधित आजाराशी झुंज देत होते. मिळालेल्या माहितीनुसार, काही काळापूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि ते बरेही झाले होते.मिथिलेश चतुर्वेदी यांचे जावई आशिष चतुर्वेदी यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याने फेसबुक पोस्टवर शेअर केले आहे.
 
चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या
 
मिथिलेश चतुर्वेदी यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. बहुतेक चित्रपटांमध्ये ते साइड रोलमध्ये दिसले. कधी बिल्डर, कधी डॉक्टर तर कधी वडील आणि सासऱ्याच्या भूमिकेत ते दिसले. भाई-भाई या चित्रपटातून त्यांनी करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी सत्य, ताल, गदर एक प्रेम कथा, पिझा, अशोका द ग्रेट, रोड, बंटी और बबली, क्रिश, गांधी माय फादर, माय फ्रेंड पिंटो अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले.