CWG2022: 92 वर्षात प्रथमच लॉन बॉल सांघिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक

03 Aug 2022 12:39:24

CWC (pic-@tw)
 
नवी दिल्ली:
 
बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत भारताने ९२ वर्षांच्यात पहिल्यादाच लॉन बॉल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावीत नवा इतिहासही रचला आहे.
 
 
 
राष्ट्रकुल स्पर्धेत लॉन बॉलमध्ये भारताने प्रथमच पदक जिंकले आहे. या स्पर्धेत न्यूझीलंडने आतापर्यंत ४० पदके जिंकली आहेत. अशा बलाढ्य संघाचा भारताने उपांत्य फेरीत 16-13 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आणि पहिल्यादांच भारतीय संघाचे अंतिम फेरी गाठली, अंतिम सामनाही खूपच चुरशीचा ठरला. समोर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान संघ होता. भारतीय संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १७-१० असा पराभव करत सुवर्णपदकावर कब्जा केला.
 
 
राष्ट्रकुल स्पर्धेत 1930 मध्ये लॉन बॉल गेमचा प्रथम समावेश करण्यात आला होता. भारतीय संघ 2010 नंतर प्रथमच लॉन बॉल स्पर्धेत सहभागी झाला. त्यानंतरच्या 2014 आणि 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला एकही पदक मिळविता आले नव्हेत. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेच्या ९२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारताने थेट सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
 
पदक नावावर करणाऱ्या रूपा राणी झारखंड सरकारच्या क्रीडा विभागात अधिकारी आहेत. तर लवली चौबे झारखंड पोलिसात अधिकारी आहेत. पिंकी या नवी दिल्लीतील शाळेत शिक्षिका तर नयन मोनी या गृहिणी आहे.
 
 
लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया व रूपा राणी टिर्की यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला संघाने अतिशय चुरशीच्या अंतिम सामन्यात प्रारंभी ८-६ अशी आघाडी मिळविली होती, परंतु त्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाने जोरदार मुसंडी मारीत सामन्यात ८-८ अशी बरोबरी मिळविली. मात्र त्यानंतर भारतीय संघ ८-१० असा पिछाडीवर पडला.
भारतीय खेळाडूंनी संयम राखत खेळाचे प्रदर्शन केले व १०-१० अशी बरोबरी मिळविली व त्यानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेला सामन्यातून डोके वर काढू देण्याची संधीच दिली नाही व हळूहळू आपली आघाडी वाढवित १७-१० असा ऐतिहासिक विजय नोंदविला.
Powered By Sangraha 9.0