Audi च्या नव्या ऑडी प्लस अन् सर्व्हिस सेंटरचे उदघाटन

    27-Aug-2022
Total Views |

audi
नागपूर:
जर्मनीची प्रमुख लक्झरी कार निर्माण करणारी कंपनी ऑडी इंडियाने नागपुरात रिटेल बिजनेसचा विस्तार करण्यासाठी नव्या प्लस शोरूमचे आणि नवीन सर्व्हिस सेंटरचे उदघाटन केले. आधुनिक सोईसुविधाने परिपूर्ण दोन्ही फॅसिलिटी नागपूरच्या सेंट्रल एमआयडीसी रोड हिंगणा येथे आहे.
यावेळी ऑडी इंडियाचे प्रमुख बलवीर सिंह ढिल्लन म्हणाले की , नागपूर शहरात नवे शारूरुमचे उद्घाटन महत्त्वपूर्ण आहे. यामुळे बिजनेस विस्तार होण्याची शक्यता आहे. देशात अशाप्रकारचे २२ शोरूम आहेत. याशिवाय एक नवीन सर्व्हिस सेंटर सुरू करण्यात आले आहे. ज्या माध्यमातून प्रकारे जुळत मागणी वाढ घेताना किंवा फायदा होतो. या माध्यमातून ग्राहकांबरोबर चांगल्या प्रकारे जुळता येईल. जगात ऑडीची मागणी वाढत आहे. तसेच विक्रेता आणि ग्राहक या दोघांनाही फायदा होतो. ग्राहकांना गाडी विकत घेण्याअगोदर गाडीचा इतिहास सांगितला जातो. ग्राहकांना स्वस्त फायनान्स आणि विमा लाभही शोरूम द्वारे मिळतो.