भाऊ ठरलं! या दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान; असे आहे आशिया कपचे वेळापत्रक

    02-Aug-2022
Total Views |

india
 (Image Credit: Internet)
 
मुंबई:
क्रिकेट जगतातील पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने नेहमीच चाहत्यांसाठी चर्चेचा विषय असतो. आता हे दोन्ही संघ आशिया चषक स्पर्धेत आपसात भिडणार आहेत.
 
आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष जय शाह यांनी नुकतेच २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पुरुष आशियाई क्रिकेट चषक स्पर्धेचे वेळापत्रक ट्विट केले आहे. त्यानुसार, हे पारंपरिक प्रतिस्पर्धी येत्या २८ ऑगस्ट रोजी आमने सामने येणार आहेत. हा सामना दुबईत होणार आहे. स्पर्धेत भारत आपला पहिलाच सामना पाकिस्तानशी खेळणार असल्याने क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
 
 
india
 
 
काय म्हणाले जय शाह?
आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह आशिया कप 2022चे वेळापत्रक ट्विट करीत लिहितात की, 'प्रतीक्षा अखेर संपली, कारण आशियाई वर्चस्वाची लढाई २७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे आणि अंतिम सामना ११ सप्टेंबरला होणार आहे. आशिया चषकाचा 15वा हंगाम आयसीसी टी-20 विश्वचषकापूर्वी एक आदर्श तयारी म्हणून काम करेल.