महाराष्ट्र ग्राहक पंचायत नागपूरच्या नव्या कार्यकारिणीची स्थापना

    02-Aug-2022
Total Views |

grahakpanchayat 
नागपूर:
ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सावनेर तालुका, जिल्हा नागपूरची नवीन कार्यकारीणीची स्थापन करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी नागपूर जिल्हा ग्रामीण सचिव कांचनमाला माकडे व नागपूर ग्रामीण संघटक श्रीराम सातपुते यांनी पुढाकार घेतला. सावनेरच्या राधाकृष्ण सभागृहात पोलिस निरीक्षक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व विदर्भ प्रांत अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.
 
विदर्भ प्रांत संघटक डॉक्टर कल्पना उपाध्याय यांनी वीज वितरण मधील ग्राहकांकरिता खूप उपयोगी माहिती दिली. ग्राहकांना तातडीने वीज सतरणची बांधिलकी आहे त्याकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे असे सांगितले.
 
अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर यांनी ग्राहकांकरीता ग्राहक चळवळ हे व्यवस्था परिवर्तनाची लढाई आहे व यात सर्व कार्यकर्त्यांनी सक्रिय भाग घेणे आवश्यक आहे असे विषद केले. कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून पत्रकार टेकाडे व नागपूर जिल्हा संघटक रेखा भोंगाडे, रामटेकेचे मोरेश्वर माकडे हे उपस्थित होते.
 
ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा सावनेर तालुका कार्यकारिणी अध्यक्ष यशवंतराव पाटील, संघटक सुभाष चिखले, सचिव धनराज निकोसे, उपाध्यक्ष विष्णू डाखरे, प्रसिद्धी प्रमुख केशव पानतावणे, सहसचिव धनराज राऊत, कोषाध्यक्ष नथुजी वांढरे, सदस्य योगराज डांगोरे, शश्री ठाकरे, प्रदीपराव अंतुरकर, दिगाम्बर चिकटे, सोनल बागडे, वंदना गणोरकर, मंदा अंतुरकर, संगीता नेरकर, पुष्पा बेले हे कार्य पाहतील. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राऊत यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता पसायदान आणि अल्पोपहाराने झाली.