अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अल-कायदाच्या म्होरक्या अल-जवाहिरीचा मृत्यू

    02-Aug-2022
Total Views |

america
(Image Credit: Internet)
नवी दिल्ली:
अमेरिकेच्या गुप्तचर संस्था मागील २० वर्षांपासून ज्या कुख्यात आतंकवादी म्होरक्या अल-जवाहिरीचा शोध घेत होत्या. याचा एका ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल-कायदाचा म्होरक्या अल-जवाहिरीचा अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मृत्यू ही मोठी बातमी आहे.
 
 
2011 मध्ये अल-कायदाचा संस्थापक ओसामा बिन लादेन मारला गेल्यापासून जवाहिरी हे काम सांभाळत होता. अफगाणिस्तानात तालिबान सत्तेवर आल्यापासून अल कायदाची ताकद वाढत आहे. जवाहिरी हा तोच दहशतवादी आहे ज्याने कर्नाटकातील हिजाब वादात अनावश्यक विधाने केली होती. त्याने हिजाब गर्लला सपोर्ट केला होता. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी अयमान अल-जवाहिरीच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.
 
अल जवाहिरीच्या मृत्यूनंतर, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन थेट भाषणात म्हणाले: न्याय झाला आहे. त्याचवेळी, अमेरिकन अधिकार्‍यांनी सांगितले की, 2011 मध्ये त्याचा संस्थापक ओसामा बिन लादेन मारला गेल्यानंतर दहशतवादी गटासाठी हा सर्वात मोठा धक्का होता.