ऑनलाईन फसवणूक: विश्वप्रख्यात या कंपनीला कोटींचा गंडा

10 Aug 2022 16:11:21

fasavanuk
(Image Credit: Internet)
नागपूर:
नागपुरात एका विश्व विख्यात ऑनलाईन कंपनीला ऑनलाईन पद्धतीनेच गंडा बसला आहे. हा गंडा १०-२० हजाराचा नसून तब्बल ३ कोटी इतका आहे. घटना नागपुरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गतची आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, हिंगणा रोडवरील प्लॉट क्रमांक १६ येथील रुक्मिणी मेटल अँण्ड जॉसेस लिमिटेड येथे अँमेझॉन ट्रान्सर्पोटेशन सर्व्हिस, प्रा. लि. नावाचे सेंटर आहे. एका अज्ञात व्यक्तीने अँमेझॉनच्या ऑनलाईन विक्रीच्या प्रणालीमध्ये आधी बनावट विक्रेते व ग्राहकांचे खाते तयार केले.
 
त्यानंतर त्याने अनेक कॅश अँन डिलिव्हरी ऑर्डर दिली. परंतु, घेतलेल्या वस्तूंची डिलिव्हरी न करता ऑर्डर रिटर्न केल्याचे दाखविले. तसेच एकूण १२ लॉगीन आयडी तयार करून बनावट ग्राहक निर्माण केले. या बनावट खात्यांवरून त्याने अनेकदा कॅश अँन डिलिव्हरी ऑर्डर दिले. यानंतर आरोपीने पुन्हा ते ऑर्डर रिटर्न केल्याचे दाखवून अँमेझॉनच्या ऑटोमॅटिक रिफंड प्रणालीमधून रिफंड प्राप्त करून घेतले. अशाप्रकारे आरोपीने अंदाजे ३ कोटी रुपयांची फसवणूक केली. या फसवणुकीची रक्कम अजून वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली असून, या अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
janmashtamni photo contest
Powered By Sangraha 9.0