Commonwealth Games 2022: संकेत सरगरला शासनाकडून ३० लाखांचे पारितोषिक जाहीर

    01-Aug-2022
Total Views |
 - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुरस्काराची घोषणा
 
weightlifter sanket sargar(Image Source : Internet) 
 
औरंगाबाद : 
इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु असलेल्या २२ व्या राष्ट्रकुल क्रीडा २०२२ मध्ये (Commonwealth Games 2022) महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वेटलिफ्टर संकेत महादेव सरगर याने रौप्य पदकासह भारताचे पदकाचे खाते उघडले आहे. २१ वर्षीय संकेतने ५५ किलो वजनी गटात एकूण २४८ किलो वजन उचलून देशासाठी पहिले पदक पटकावले आहे. या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी संकेतचे अभिनंदन करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
 
महाराष्ट्र शासनाकडून देखील रौप्यपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सांगलीतील संकेत सरगरला ३० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी औरंगाबाद येथे याबाबतची घोषणा केली.
कॉमनवेल्थ स्पर्धेत देशासह महाराष्ट्राच्या नावावर रौप्य पदकाची मोहोर उमटविणाऱ्या सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या संकेत सरगर या खेळाडूची ही कामगिरी उल्लेखनीय व अभिनंदनीय बाब आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने संकेत सरगरला ३० लाख रुपये तर त्याच्या मार्गदर्शकांनाही साडेसात लाखांचे पारितोषिक जाहीर करून संकेतची कामगिरी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.