आषाढीच्या महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

    05-Jul-2022
Total Views |
 

ashadi maha puja
 (Image Source : Internet)
 
 
मुंबई :
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु असलेला राजकीय गदारोळ वाढतच चालला होता. अशात आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला श्री विठ्ठलाची महापूजा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार की भाजपा नेते देवेंद्र फडणवीस असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, शिवसेनेतील आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यात शिवसेना-भाजपाचे नवे सरकार स्थापन झाले आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. याच पार्श्वभूमीवर परंपरेनुसार श्री विठ्ठलाच्या महापूजेचे निमंत्रण देण्यात आले आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठलाच्या महापूजेचे पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आज निमंत्रण देण्यात आले आहे. समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली तसेच त्यांचा वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन सत्कार केला.
 
याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर प्रांत अधिकारी आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव तसेच मंदिर समिती सदस्य आदी उपस्थित होते.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.