अमरावती हत्याप्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराला नागपुरातून अटक

03 Jul 2022 12:40:20
नागपूर:
अमरावती जिल्ह्यात ५४ वर्षीय औषध विक्रेते उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असणाऱ्या इरफान खान याला नागपुरातुन अटक करण्यात आली आहे.
 
murdar
 (imc/internet)
 
उमेश कोल्हे यांच्या हत्येतील मुख्य आरोपीला अमरावती पोलिसांनी नागपुरातील नंदनवन परिसरातून अटक केली आहे. अमरावती शहर कोतवाली पोलिस ठाण्याच्या निरीक्षक नीलिमा अराज यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, इरफान खान असे आरोपीचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत इरफान खानसह ७ आरोपींना अटक केली आहे.
 
 
 
इरफान खान हाच या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असल्याचे सांगण्यात येते. इरफान खान एक स्वयंसेवी संस्था चालवतो. नूपुर शर्माला पाठिंबा दिल्याबद्दल इरफानने उमेश कोल्हे यांना ठार मारण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि त्याने संपूर्ण योजना आखली होती.

नेमकं प्रकरण काय?
 
गेल्या २१ जून रोजी अमित मेडिकल शॉपचे संचालक उमेश कोल्हे हे क्लॉक टॉवरच्या मार्गे मुलगा आणि सुनेसोबत दुकान बंद करून घरी परतत होते. त्याचवेळी ३ मोटारसायकलस्वारांनी त्याला अडवून त्याच्या मानेवर चाकूने वार केले. या हल्ल्यात उमेश गाडीतून खाली पडला. घटनेनंतर गुन्हेगार पळून गेले. घटनेनंतर उमेशचा मुलगा आणि सून रक्तबंबाळ अवस्थेत त्याला रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यांनतर या प्रकरणाची चौकशी आता केंद्रीय यंत्रणेकडे देण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0