कतरिना-विकीला जीवे मारण्याची धमकी देणार्‍याला अटक

    25-Jul-2022
Total Views |

vicky katrina
(Image Source : Internet)
 
 
मुंबई :
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफबाबत सोमवारी एक धक्कादायक बातमी समोर आली. विकी आणि कतरिना यांना एका अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. इतकेच नाही तर तो व्यक्ती कतरिनाला सोशल मीडियावर स्टॉक देखील करत होता. यानंतर याप्रकरणी विकी कौशलने धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. मुंबई पोलिसांनी देखील अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. आता या प्रकरणाबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे.
 
 
 
मुंबई पोलिसांनी विकी आणि कतरिनाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीला अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, 'कतरिना कैफ आणि विकी कौशल यांना सोशल मीडियावरून धमकावणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.'
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, एक अज्ञात व्यक्ती सोशल मीडियावर कतरिना कैफला खूप दिवसांपासून स्टॉक करत होता. पण जेव्हा विकी कौशलला त्याच्या पत्नीला म्हणजेच कतरिनाला एक व्यक्ती स्टॉक करत असल्याची माहिती मिळाली, तेव्हा त्यानेही त्या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्या व्यक्तीने ते मान्य नव्हते. या व्यक्तीचे नाव आदित्य राजपूत असल्याची माहिती समोर आली आहे. विकी कौशलने आदित्यला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या व्यक्तीने विकीला धमकी देण्यास सुरुवात केली. अखेर विकी कौशलने कठोर पाऊल उचलत आदित्य विरोधात सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांताक्रूझ पोलिस ठाण्यात अभिनेता विक्की कौशलच्या तक्रारीवरून ५०६(२), ३५४(डी) आयपीसी कलम ६७ आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. एक व्यक्ती इंस्टाग्रामवर धमकावत आहे आणि धमकीचे संदेश पोस्ट करत असल्याची तक्रार विकीने केली. आरोपी त्याच्या पत्नीचा म्हणजेच कतरिनाचा पाठलाग करत आहे आणि तिला धमकावत आहे, असे विकीने सांगितले. आम्ही देखील त्या व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला असून त्याच्याबद्दल अधिक तपशील मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत, असे पोलिस म्हणाले.
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.