Shamshera Movie Review : शमशेरा- बिना धारेची शमशीर

24 Jul 2022 15:28:49

shamshera movie poster(Image Source : Internet) 
 
कर्म से डकेत धर्म से आझाद, या टॅग लाईनला घेऊन असलेला हा सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला. सिनेमाच्या ट्रेलरवरून वाटलेले की सिनेमामध्ये काहीतरी नवीन, इंटरेस्टिंग असेल. पण सिनेमाची सुरुवात जेव्हा गाण्याने झाली, तेव्हाच लक्षात यायला लागले की रणबीरने पुन्हा अपेक्षाभंग केला आहे. खमेरन (खालच्या जातीचा) लोकांचा सरदार असलेला शमशेरा, त्यांच्या लोकांच्या आझादीसाठी लढत असतो. काजा (वरच्या जातीचे) लोकं त्यांची तक्रार गोऱ्या सरकारकडे करतात.
 
इथे एन्ट्री होते शुद्ध सिंगची म्हणजेच संजय दत्तची. इथून सिनेमाची स्टोरी प्रेडिक्टेबल होऊन जाते. संजय दत्त धोक्याने शमशेराला पकडतो आणि त्याच्या पूर्ण समाजाला गुलाम बनवतो. या गुलामीपासून आझादी मिळावी यासाठी शमशेरा काजाच्या किल्ल्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो. पण त्यात त्याला अपयश येते आणि धोक्याने संजय दत्त त्याला मारतो. 
 
त्यानंतर २५ वर्षांनंतर त्याचा मुलगा बल्ली एक मदमस्त माणूस बनतो. पण नंतर त्याला कळते की त्याचा बाप कोण होता आणि तो आपल्या बापाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघतो. तो काजाच्या किल्ल्यातून बाहेर पडतो आणि एक नवीन शमशेरा जन्माला येतो. हा नवीन शमशेरा जाऊन शुद्ध सिंगला भिडतो. पण इथे लक्ष खेचून घेतात ते म्हणजे कावळे. आता तुम्ही म्हणाल इथे कावळे कसे तर ते सिनेमा बघितल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल... इथे वाणी कपूर म्हणजे सोना. तिचे आणि बल्ली यांचे नंतर लग्न. अशी ही शमशेराची स्टोरी आहे.
 
त्यामुळेच सुरुवात केली, शमशेरा विना धारेची शमशीर...
 
सिनेमाचे मुख्य आकर्षण म्हणजे संजय दत्त आणि भरपूर कावळे...
 
 
 
RJ सिद्धेश
७०२०७९१२५६
नागपूर
 
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत. 
Powered By Sangraha 9.0