कॉपी बहाद्दररांसाठी बोर्डाचे दक्षता पथक

    23-Jul-2022
Total Views |
नागपूर:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीची २१ जुलै ते १२ ऑगस्टपर्यंत व दहावीची 27 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत परीक्षा आयोजित करण्यात आली असून, परिक्षार्थींना तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांततापूर्ण वातावरणात पार पाडणे आवश्यक आहे.
 
 
copy bords
 
महत्वाच्या विषयाच्या पेपरच्या दिवशी उपद्रवी केंद्रांना आकस्मिक भेटी देवून गैरप्रकारांना प्रभावीपणे आळा घालण्यासाठी दक्षता पथक गठीत करण्यात आला आहे. दक्षता पथकात प्राधान्याने स्त्री प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे.
 
या दक्षता पथकात उपजिल्हाधिकारी भुसंपादन हेमा बडे, माधुरी तिखे, नायब तहसिलदार ए.एस. जाधव, अरविंद जयस्वाल, योगिता यादव या पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर महत्वाच्या विषयाच्या पेपरच्या दिवशी उपद्रवी केंद्रांना दक्षता पथकातील अधिकारी आकस्मिक भेट देवून कार्यवाही करणार आहेत. असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी नागपूर यांनी आदेशात नमूद केले आहे.